Manoj Jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणप्रश्नी अंतरवाली सराटी (ता.अंबड,जि. जालना) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आज खालावली. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal
Updated on

वडीगोद्री (ता. अंबड, जि. जालना) : मराठा आरक्षणप्रश्नी अंतरवाली सराटी (ता.अंबड,जि. जालना) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आज खालावली. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. वैद्यकीय उपचार, सलाईन घेण्यास त्यांनी मंगळवारी वैद्यकीय पथकाला नकार दिला. सगेसोयऱ्यांबाबतच्या निर्णयाची अंमलबजाणी व्हावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह अन्य मागण्यांवर ते ठाम आहेत.

जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणीसाठी सकाळी अकराच्या सुमारास वैद्यकीय पथक दाखल झाले. त्यांनी जरांगे यांची रक्तदाब, मधुमेह व इतर तपासण्या केल्या. उपचार व सलाईन लावण्यास गरज आहे, असे पथकाने सांगितल्यावर जरांगेंनी त्याला नकार दिला.

सरकारकडून कुणीही अद्याप संपर्क साधलेला नाही. दोन दिवसांपासून भर पावसात समाजबांधव पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी येत आहेत. सरकारने त्याची जाण ठेवावी. सरकार गोड बोलून फसवणूक करीत आहे, असे जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.‘टिकणारे आरक्षण दिले आहे, आता जरांगे यांनी शांत राहावे,’ असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले होते. त्यावर ‘आम्ही आमचे बघून घेऊ’, असे उत्तर जरांगेंनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.