निलंगा : गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या अंतरवली सराटी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शासनाच्या विरोधात सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी ता. २२ रोजी सामूहिक मुंडण आंदोलन करून शासनाचा निषेध केला. तर कांही मराठा समाज बांधवांनी ३०० फूट उंच टॉवर वर चढून शासनाचा निषेध केला.
गेल्या तेरा महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी विविध आंदोलने, रास्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण असे विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज बांधवांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विविध आंदोलने करत पाठिंबा देत आहेत. मात्र गेल्या तेरा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळत नाही. सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे शासनाने तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावा अशी मागणी केली जात आहे.
त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या अंतरवली सराटी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शासनाच्या विरोधात सकल मराठा समाज निलंगाच्या वतीने मोठ्या संख्येने सहभागी होऊन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक मुंडण आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांची दिवसेंदिवस प्रकृती चिंताजनक होत आहे.
त्यांच्या तब्येतीची काळजीपूर्वक व गांभीर्याने विचार करावा, तसेच आरक्षणासंबंधित तात्काळ सर्व मागण्या मान्य करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येतील अशा तीव्र भावना सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आले. यावेळी राजेंद्र राघो, गणेश सूर्यवंशी, डिगंबर जाधव, अंकुश धनुरे, चक्रधर शेळके, किरण पाटील, माधव वाडीकर यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी मुंडण केले आहेत.
तर कांही मराठा समाज बांधवांनी येथील ३०० फूट उंच टॉवर वर चढून विविध रंगाच्या धुराचे नळकांडया फोडून शासनाचा निषेध केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी स्वतः पोलीस फौज फाटा घेऊन ३०० फूट उंच टॉवर वर चढून आंदोलन करणाऱ्या समाज बांधवाना खाली येण्याची विनंती केली.
त्यानंतर येथील समाज बांधवांनी अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्यांना फोनवर संपर्क साधून आंदोलकांना विनंती केले त्यानंतर सर्वांच्या विनंतीला मान ठेऊन आंदोलकांनी ३०० फूट उंच टॉवर वरून खाली उतरले. शेकडो मराठा समाज बांधव या मुंडण आंदोलनात सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.