Marathawada mukti sangram din : चौफेर विकासासाठी व्हावेत सामुदायिक प्रयत्न

नांदेडकरांची अपेक्षा; भूमी सधन तरीही विकासात मात्र अजूनही मागे
Marathawada mukti sangram din
Marathawada mukti sangram dinsakal
Updated on

नांदेड : महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावर असलेला नांदेड जिल्हा मराठवाडा मुक्ती संग्रामातील चळवळीचे मुख्य केंद्र राहिला आहे. गोदावरी नदीचे नाभीस्थान, माहूरची श्री रेणुकादेवी आणि श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नांदेडची भूमी सधन असली तरी विकासाच्या बाबतीत मात्र अजूनही नांदेड मागे आहे. आता हळूहळू नांदेडची वाटचाल शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने ‘हब’ बनत चालली आहे. शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यावर आधारित कृषिपुरक प्रक्रिया उद्योगाला आता गती मिळाली पाहिजे. त्याचबरोबर उद्योगधंदे उभारणीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. समृद्धी महामार्गाला जोडणारा नांदेड - जालना या जोडमार्गाला तसेच मुंबई - औरंगाबाद - नांदेड - हैदराबाद बुलेट ट्रेनची आणि नांदेड - लातूर रेल्वे मार्गाची मागणीही भविष्यात पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

ऐतिहासिक, धार्मिक आणि राजकीय वारसा लाभलेला नांदेड जिल्हा आहे. त्याचबरोबर मराठवाड्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणूनही नांदेडची ओळख आहे. जगप्रसिद्ध मुख्य सचखंड गुरूद्वारामुळे नांदेडची ओळख जगभरात आहे. राज्यातील महत्वाच्या शहरापैकी एक असलेल्या नांदेडचाही विकास इतर शहरांच्या बरोबरीने होत असला तरी विकासाची खरी गती गुरूता गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने मिळाली. रस्ते, विमानतळ, वीज, पाणी या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विकासाच्या दृष्टीने भरपूर वाव आहे.

दिवसेंदिवस नांदेडमध्ये बदल होत चालले असून इतर शहरांसारखे नांदेडही वाढत चालले आहे. भविष्यात नांदेड प्रदूषणमुक्त, आॅनलाइन आणि सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक बनावे, यासाठी देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय आणि सहकार्याची भावना असली पाहिजे. तसेच नागरिकांनी देखील मानसिकता बदलून सामाजिक कार्यात सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य, पर्यटन या सर्व अंगानी विचार करून नियोजन केले तर भविष्यात त्याचा फायदा नांदेडसोबत सर्वांनाच होईल.

नांदेड जिल्ह्याच्याविकासासाठी ‘हे’ हवे....

नांदेडला विभागीय महसूल आणि पोलिस आयुक्तालय सुरू व्हावे.

बंद पडलेली विमानसेवा पुन्हा तत्काळ सुरू व्हावी.

उद्योगधंदे उभारणीसाठी प्रयत्नासोबतच जमीन उपलब्ध व्हावी.

कृषी पुरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि जोडधंद्याची उभारणी व्हावी.

आरोग्य व शिक्षण क्षेत्रात वाव असल्याने त्या दृष्टीने सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात.

जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अभ्यासिका व्हावी.

विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे तसेच विमानतळाशेजारी कार्बोहबची उभारणी व्हावी.

श्री गुरूगोविंदसिंगजी क्रिकेट स्टेडीयम आंतरराष्ट्रीय दर्जाचे लवकर तयार व्हावे.

रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व्हावे तसेच मुंबई - औरंगाबाद - नांदेड - हैदराबाद या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करावी

नांदेड - लातूर आणि नांदेड - बिदर या मार्गासाठी प्रयत्न व्हावेत तसेच नवीन रेल्वेगाड्या सुरू कराव्यात.

समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी नांदेड - जालना जोडमार्गाचे काम लवकर व्हावे.

व्यवसायभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण मिळावे.

लेंडी प्रकल्पासह इतर अर्धवट राहिलेले प्रकल्प मार्गी लागावेत.

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा विस्तार व्हावा.

एकाच ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा रूग्णांना देण्यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलची उभारणी व्हावी. त्यात कॅन्सरसह इतर आजारावर उपचार व्हावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.