Maratha Quota Protest : मराठा आंदोलनाचा भडका; बसची जाळपोळ, वाहनांची तोडफोड; पोलिसांकडूनही लाठीहल्ला

अंतरवाली सराटीत तुफान दगडफेक; पन्नासपेक्षा अधिक आंदोलक जखमी
maratha quota protest turns violent in jalna maharashtra police injured lathicharge
maratha quota protest turns violent in jalna maharashtra police injured lathichargeSakal
Updated on

जालना, वडीगोद्री : अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. आंदोलक-पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली.

आंदोलकांनी दगडफेक केल्याचा दावा करून पोलिसांनी लाठीमार केला. यात तीस ते चाळीस आंदोलकांसह सुमारे वीस पोलिस जखमी झाले. या जखमींमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे यांचाही समावेश आहे.

या घटनेचे पडसाद जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये उमटले. राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बस जाळण्यात आल्या तर दगडफेकीत सात बसचे नुकसान झाले. मराठा आरक्षणप्रश्नी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे.

maratha quota protest turns violent in jalna maharashtra police injured lathicharge
Jalna Maratha Reservation : एवढा मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशक्य; ठाकरे गटाचा आरोप

त्यांच्या या आंदोलनात जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील गोदावरीनदीकाठच्या सुमारे १३० गावांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलन सुरू केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

मात्र, ते आंदोलनावर ठाम राहिले. मागील तीन दिवसांमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याने जरांगे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आज दुपारी साडचारच्या सुमारास पोलिस दाखल झाले होते.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केला. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही. यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ जमा झाले. पोलिसांचा फौजफाटा वाढल्याने आंदोलनस्थळी मंडपातील ग्रामस्थ व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

maratha quota protest turns violent in jalna maharashtra police injured lathicharge
Jalna Maratha Reservation : मराठा आरक्षण तापणार! ''जालन्याच्या घटनेत पोलिसांचा दोष नसून...'' पवार थेटच बोलले

त्यानंतर दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीमार केला. यात गावातील तीस ते चाळीस ग्रामस्थ जखमी झाले. या दगडफेकीत अप्पर पोलिस अधीक्षक राहुल खाडे,

उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, बीडच्या अप्पर पोलिस अधीक्षकांसह २० पोलिस अधिकारी- कर्मचारी जखमी झाले. जखमींवर वडीगोद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बस- कारची जाळपोळ

या आंदोलनाचे पडसाद जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले. संतप्त जमावाने सोलापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर वडीगोद्री येथे तीन बस, अंतरावाली सराटी मार्गावर एक खासगी कार जाळली. सुमारे सात एसटीबसवर दगडफेक करण्यात आली. अनेक खासगी वाहनांवरही दगडफेक झाली. या दगडफेकीत पोलिसांच्या सुमारे दहा ते पंधरा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

maratha quota protest turns violent in jalna maharashtra police injured lathicharge
Jalna Rain News : जालना जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट; हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

घटनाक्रम

- दुपारी ३.३० ः ३०० ते ३५० पोलिस आंदोलनस्थळी

- सायं ४ ः चर्चेसाठी अधिकारी आंदोलनस्थळी दाखल

- पहिल्या बोलणीमध्ये या चर्चेवर तोडगा निघाला नाही

- थोड्यावेळाने पुन्हा पोलिस चर्चेसाठी आंदोलनस्थळी

- आंदोलनस्थळी एक ते दीड हजार जमावाचा पोलिसांना घेराओ

- सायं ४.३० ः पोलिस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

- ५ ते ५.३० नागरिक व पोलिसांत हाणामारी. नागरिकांकडून दगडफेक

- पोलिसांकडून लाठीमारासह प्लॅस्टिक बुलेट, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा

maratha quota protest turns violent in jalna maharashtra police injured lathicharge
Jalna Maratha Reservation : मराठा आरक्षण तापणार! ''जालन्याच्या घटनेत पोलिसांचा दोष नसून...'' पवार थेटच बोलले

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये.

- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, आम्ही त्यांना आरक्षण देऊ. केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळेच मराठा समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे. काँग्रेस आघाडी सरकारने दिलेले मराठा आरक्षण फडणवीस सरकारला कोर्टात टिकवता आले नाही. मुळात भाजपला आरक्षण द्यायचेच नाही म्हणून ते चालढकल करत आहेत. फडणवीस व भाजपने मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे.

-नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला करण्याची आवश्यकता नव्हती. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांबाबत रस्त्यावर आले की, बळाचा वापर करावी ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी. गृहमंत्र्यांच्या मनातील भावना पोलिसांच्या कृतीतून दिसली

- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी

जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. जनतेने शांतता राखावी.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला हा सरकारचा क्रूरपणा आहे, त्याचा मी निषेध करतो. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवय आरक्षण देता येणार नाही मात्र सत्ताधाऱ्यांनी खोटे बोलून मते घेतली.

- विजय वडेट्टीवार, विरोधी नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()