Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या; तरुणाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आंदोलन करत आहे. या आंदोलनाला काही भागात हिंसक वळण लागलं आहे, तर काही भागात अद्याप शांततेत आंदोलन सुरू आहे. तर काही तरूणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

जालना जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी तरूणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्वपान बाबुराव कचरे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी, जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, स्वपान हा जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील रहिवासी होता. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वपान आंदोलन करीत होता. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने स्वपान अस्वस्थ झाला होता.

मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, तर मी माझं जीवन संपवणार, असं स्वपान आपल्या काकांना सांगत होता. दरम्यान, आरक्षणाची मागणी करुन देखील सरकारकडून कोणतीही ठोस पाऊलं उचलली जात नसल्याने स्वपानला नैराश्य आलं होतं.

Maratha Reservation
Maratha Reservation : आग लावली तेव्हा क्षीरसागरांच्या बंगल्यात कोण होतं?, कुटुंबातील सदस्य 'असे' पडले बाहेर

याच नैराश्यातून त्याने टोकाची भूमिका घेत शेतातील विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. घटनेची माहिती मिळताच मराठा बांधवांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी स्वपानचा मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. स्वपान हा विवाहित असून त्याला एक सहा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाचा मुलगा आहे. मुलांच्या भवितव्यासाठीच स्वपानने हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maratha Reservation
Jalna News : हलदोला रस्त्यावरील रेल्वे रुळावर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न, बदनापूर रेल्वे स्थानकावर तासभर रेल्वे थांबवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.