Maratha Reservation : आरक्षणासाठी अनोखे आंदोलन; पाचेगाव ते जिंतूर अर्धनग्न पदयात्रा

जिंतूर तालुक्यात मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी ठीकठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहेत.
Maratha Reservation agitation pachegav to jintur Walking half naked
Maratha Reservation agitation pachegav to jintur Walking half nakedsakal
Updated on

जिंतूर - तालुक्यात मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी ठीकठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहेत. या आंदोलन पाठिंब्यासाठी शुक्रवारी (ता. ०३) दुपारी जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, मानधानी, रेपा, भोगाव, पुंगळा या गावातील सकल मराठा समाजाच्यावतीने सोळा किलोमीटर पायी चालत अनोखे अर्धनग्न आंदोलन केले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्याचा वेळ देऊन उपोषण सोडण्यात आले.

Maratha Reservation agitation pachegav to jintur Walking half naked
Maratha Reservation : अखेर डॉ. उद्धवराजे काळे यांचे अन्नत्याग उपोषण मागे

मात्र साखळी उपोषण, नेत्यांना गावबंदी कायम ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील वरील गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने पद यात्रा काढून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी पदयात्रा शहरात आल्यावर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात सरसगट मराठा समाजाचा ओबीसी प्रवगातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी,आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला घर बांधून द्यावे. या मागण्या करण्यात आल्या. यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावरून सदरची पदयात्रा काढली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे बांधव सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.