Maratha Reservation : उच्च वाहिनीच्या विद्युत टॉवरवर चढून १८ ते २० तरुणांनी केले पाच तास आंदोलन

खादगाव (ता. बदनापूर) येथील संतप्त १८ ते २० मराठा तरुणांनी शनिवारी (ता. २८) पाच तास थापटी तांडा ते नागेवाडीकडे जाणाऱ्या २२० के. व्ही. उच्च क्षमतेच्या विद्युत टॉवरवर चढून आंदोलन केले.
Electricity Tower
Electricity Towersakal
Updated on

बदनापूर (जिल्हा जालना) - सरकारला मागितलेली निर्धारित मुदत संपली तरी अद्याप मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही, शासनाने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत खादगाव (ता. बदनापूर) येथील संतप्त १८ ते २० मराठा तरुणांनी शनिवारी (ता. २८) पाच तास थापटी तांडा ते नागेवाडीकडे जाणाऱ्या २२० के. व्ही. उच्च क्षमतेच्या विद्युत टॉवरवर चढून आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी 'एक मराठा-लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे' अशा गगनभेदी घोषणा देत अवघा आसमंत दणाणून सोडला. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आंदोलक तरुणांना टॉवरखाली उतरण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले.

शेवटी मराठा मोर्चाचे समन्वयक राजेश जऱ्हाड, नंदकिशोर दाभाडे, गजानन महाराज देठे, नारायण गजर आदींनी आंदोलनस्थळी धाव घेतली. तर प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार रामेश्वर दळवी, फौजदार श्री. राऊत व पोलिस कर्मचारी देखील आंदोलनस्थळी दाखल झाले. यानंतर मराठा मोर्चा समन्वयक, ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलक मराठा तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

नायब तहसीलदार श्री. दळवी यांनी आपल्या भावना आम्ही जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ पोहचवू, असे आश्वासन दिले. यानंतर तब्बल पाच तासानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित करीत टॉवरखाली आले. अर्थात शासनाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत तातडीने निर्णय घेतला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()