मनोज जरांगे-पाटलांच्या महाशांतता रॅलीला मराठा-मुस्लिम बांधव रवाना; बिडकीनमध्ये 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा

महाशांतता रॅलीमध्ये जिल्हाभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत.
Maratha-Muslim community
Maratha-Muslim communityesakal
Updated on
Summary

या जमावामध्ये मराठा बांधवांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये मुस्लिम बांधवांनी ही आपली आगळीवेगळी वेशभूषा परिधान करून या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला आहे.

बिडकीन : आज छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली महाशांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी सहभाग घेतला असतानाच, दुसरीकडे मुस्लिम बांधवांच्या वतीने ही जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत मोठ्या संख्येने रॅलीला निघाले आहेत.

मराठा व मुस्लिम समाजाचा (Maratha Reservation) वाढता सहभाग नोंदवत बिडकीनपासून ते सिडको बस स्थानक परिसरात एक मराठा, लाख मराठा.., आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे.! अशा विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

Maratha-Muslim community
'मी पायानं अपंग असलो, तरी मराठा आरक्षण मिळणं महत्त्वाचं'; पोलिसांनी गाड्या अडविल्याने अपंगांची 3 किलो मीटरपर्यंत कसरत

आजची महाशांतता रॅली सिडको बस स्थानक ते क्रांती चौक दरम्यान होणाऱ्या महाशांतता रॅलीमध्ये जिल्हाभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. सिडको बस स्थानकात जालना रस्त्यावर असणाऱ्या उड्डाण पुलाखाली थांबून मोठा जमाव जमवत होता. या जमावामध्ये मराठा बांधवांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये मुस्लिम बांधवांनी ही आपली आगळीवेगळी वेशभूषा परिधान करून या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला आहे.

बिडकीन येथील मराठा आंदोलक मनोज पाटील मुरदाडे, संतोष पाटील कुसेकर, विजय पाटील-शेळके, भागवत पाटील नरवडे, धनंजय पाटील चिरेकर, सोफियान भाई चाऊस आदींसह परिसरातील समाज बांधवांच्या वतीने ही मोठ्या प्रमाणावर रवानगी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.