Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या! पालकमंत्र्यांनी घेतली शिक्षण अन् लेकीला सासरला जाईपर्यंत जबाबदारी

Tanaji Sawant
Tanaji SawantSakal
Updated on

येरमाळा : येरमाळा येथील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या शहाजी कदम या तरूणाच्या कुटुंबीयांची पालक मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांचे सांत्वन करुन एक मुलगा व दोन मुलींची शिक्षणाची जबाबदारी व मुली शिकवून त्यांची सासरी पाठवणी करेपर्यंत पालकत्व घेतल्याचा शब्द आत्महत्याग्रस्त कदम कुटुंबीयांना दिला.

धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सोमवारी त्यांनी भेट दिली. शुक्रवारी (ता.आठ) रात्री राहत्या घरी कदम यांनी आत्महत्या केली होती. हा प्रकार पोलिस प्रशासनाने दडपण्याचा प्रकार केल्याने मराठा समाजाने वतीने पोलिस प्रशासना विरुद्ध गावबंद व रास्ता रोको आंदोलन केले होते.

Tanaji Sawant
Maratha Reservation : गृहमंत्री फडणवीसांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाची फ्रंट पेज जाहिरात

जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत दौऱ्यावर आले असता त्यांनी येरमाळा येथील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या शहाजी हरिदास कदम याच्या कुटुंबीयांना भेट दिली. सावंत यांनी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या आई, पत्नी, मुलांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

शहाजी कदम यांच्या पाश्चात एक सात वर्ष, पाच वर्षांच्या दोन मुली आणि दोन वर्षाचा मुलगा, आई, पत्नी असा परिवार आहे. यावेळी त्यांनी शहाजी कदम यांच्या पत्नी व आईला धीर देत आपण मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदारी सह मुलीचे सासरी जाईपर्यंत पालकत्व स्विकारतो असे यावेळी सांगितले.

शिवाय मराठा आरक्षण आंदोलनात आत्महत्या केलेला शहाजी कदम सक्रिय होता. इतर आंदोलकांना तो कांहीतरी वेगळं केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही असे म्हणत होता. पोलिसांनी कुटुंबियांच्या जबाबावरून आकस्मित मृत्यूची नोंद घेतली असल्याचे तानाजी सावंत यांना सांगितले.

या साठी मराठा आंदोलकांनी गाव बंद रास्ता रोको आंदोलन केले होते असे सांगताच कुटुंबीयांचे पूनर्जबाब घेऊन आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांना घेण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी साहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांना दिले.

Tanaji Sawant
Video : 'महिला अन् तृतीयपंथीयांसाठीची 'शक्ती योजना' रद्द करा..' काँग्रेस सरकारविरोधात खासगी वाहतूक संघटना संपावर

यावेळी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, माजी सभापती धनंजय सावंत, शिवसेना प्रमुख सूरज साळुंके, अनिल खोचरे, अजित पिंगळे, बाळासाहेब उंदरे, संजय बारकुल, तर मराठा आंदोलक बालाजी बारकुल, तानाजी बारकुल, सुहास बारकुल, दत्ता बारकुल, संतोष बारकूल माजी जि.प.सदस्य मदन बारकुल उपस्थित होते.

येरमाळ्यातील तरुणानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या घटनेचे वृत्त मी दैनिक सकाळ मध्ये वाचले होते. वृत्त वाचल्या नंतर या कुटुंबीयांना भेटण्याचे मी ठरवले होते असे त्यांनी दैनिक सकाळच्या बातमीदार यांच्याशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.