Maratha Reservation : प्रशासकीय कामकाजाचे लातुरात दीडशे वर्षांपूर्वीची कागदपत्रे

‘कुणबी’च्या शोधातून निजामशाहीचा उलगडा
MARATHWADA
MARATHWADA sakal
Updated on

लातूर - सरकारी विभागाकडील रेकॉर्डमध्ये कुणबी जातीच्या नोंदीच्या शोध घेताना निजामशाहीचा इतिहास समोर आला. येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयात तब्बल निजाम सरकारच्या कामकाजाची दीडशे वर्षांपूर्वीची कागदपत्रे आढळून आली. त्यातून निजाम सरकारच्या शासकीय कामकाजाचे दर्शन घडले.

मोडी लिपीत ही सर्व कागदपत्रे असून, निजामकालीन कामकाजाची नोंद असलेल्या ६५ नमुन्यांतील काही कागदपत्रांचे वाचन केल्यानंतर मोडी अभ्यासक डॉ. संतोष यादव यांचेही निजामशाहीबाबत कुतूहल वाढले आहे. यानिमित्त निजामशाहीचा नवा इतिहासही समोर येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

निजामचे कामकाज मोडी व उर्दू भाषेत चालत होते. कामकाजाची बहुतांश कागदपत्रे उर्दू भाषेतील असले तरी अनेक कागदपत्र मोडी भाषेतील आहेत. आतापर्यंत शेती व इनाम जमिनीच्या वादाच्या निमित्ताने उर्दू भाषेतील कागदपत्रांची माहिती सर्वांना होती. मात्र, कुणबीच्या नोंदी घेताना निजामशाहीच्या कामकाजाची भाषा मोडीदेखील असल्याचे समोर आले आहे.

MARATHWADA
Marathwada : पुढच्या पिढीच्या नशिबी दुष्काळ येऊ नये म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकरांची जलसाक्षरता रॕली

तालुका भूमिअभिलेख कार्यालयात निजामशाहीचे मोडी लिपीतील रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवले असून, त्यात निजाम सरकारच्या सर्व प्रशासकीय कामकाजाशी संबंधित अनेक नोंदी समोर आल्या आहेत. निजामशाहीत जमिनी, घरे, व्यक्ती, जनावरे, जमिनीचे वाद, शिव, पोलिस कामकाज आदी संदर्भाने ६५ हून अधिक प्रकारची कागदपत्रे आढळले आहेत.

यात प्रति बूक, पक्का बूक, शेतवार पत्रक, शिव (दोन गावांच्या हद्दी) बूक, इसमावर पत्रक, अस्सल शेतवार पत्रक, जमाबंदीकडील वसूल बाकी पत्रक, बागाईत बूक, जमीन मोजणीदार बूक, मोजणी बूक नमुना नंबर पाच, पीक पाहणी बुक नंबर ५३, जमिनीचे प्रकार खुश्की, तरी, बागायत, मोक्याचे हालती प्रमाणे रजिस्टर (सद्यस्थितीत कोणत्या अवस्थेत आहे.

MARATHWADA
Maratha Reservation: शिंदे-फडणवीस अन् अमित शाहंच्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा! लवकरच...

तिथे जाऊन पाहणी करायचे), पाणी भरणारे जमिनीचा तपशील, खोली तळापासून पाण्यापर्यंत, हिसे आणेवारीचा तपशील, सर्वे नंबर, पोट नंबर, जमिनीचा प्रकार, एकर, गुंठे, भाग आणे, विहिरीच्या शिवा व त्याची मुदती सहीत खुलासा, मोहित मीम बंदोबस्त, दप्तरी कायम एकर अशा एक अनेक पद्धतीच्या नोंदी निजाम करत असल्याचे कागदपत्रांवरून दिसत असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले. दोन गावांच्या हद्दीचे (शिव) वाद निजाम सरकारचे अधिकारी दोन्ही गावांतील लोकांना एकत्र करून सोडवत असल्याच्याही नोंदी आढळल्याचे डॉ. यादव म्हणाले.

निजामशाही सुचिबद्ध करणार

निजामशाहीचे कामकाजाच्या नोंदी ६५ नमुन्यात असल्याचे मोडी लिपीतील कागदपत्रांवरून दिसत आहे. सध्या ४५ नमुन्यांचे प्रकार अभ्यासाला घेतले आहेत. या कागदपत्रांचे मराठीत भाषांत्तर करण्यात येणार असून, कागदपत्र सूचिबद्ध करण्यात येणार आहे.

MARATHWADA
Chh. Sambhaji Nagar : महापालिकेत या, पण हेल्मेट घालूनच!

त्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनीही निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. सुचिबद्धतेत एका बाजूला मोडी लिपीतील कागदपत्रे तर दुसऱ्या बाजूला त्याचा मराठी अनुवाद असणार आहे. यानिमित्त सर्वांना दीडशे वर्षांचा इतिहास याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहे. निजाम सरकारकडील नोंदीसाठी हैद्राबादला जाण्याची गरज नाही. सर्व दस्ताऐवज व रेकॉर्ड निजाम हैद्रबादला घेऊन गेलेला नाही. सर्व रेकॉर्ड येथेच असल्याचे दिसत आहे, असेही डॉ. यादव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.