Maratha Reservation : घनसावंगी पंचायत समितीच्या कार्यालयास आग; कागदपत्रे जळून खाक, अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

घनसावंगी येथील आमदार राजेश टोपे यांच्या संपर्क कार्यालयात काही मराठा आंदोलकांनी रात्री पेट्रोलसह घुसण्याचा व आग लावण्याचा प्रयत्न केला
Maratha Reservation
Maratha ReservationSakal
Updated on

घनसावंगी : घनसावंगी येथील पंचायत समितीच्या कार्यालयास सोमवार  (ता.30 ) रात्री साडे अकरा वाजता अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने पंचायत समितीचे बांधकाम विभागांतील फाईलसह कागदपत्रे जळून खाक झाली.असून सद्या राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणांच्या विषयावरून जाळपोळ करण्याचे प्रकार घडल्याने घनसावंगी येथे झालेल्या प्रकारावर सर्वत्र तर्कविर्तक लावले जात आहे.

पंचायत समितीच्या कार्यालयातील बांधकाम विभागांच्या रूमला अचानक आग लागल्याचे दिसताच येथील शिपाई किसन पवार यांनी घनसावंगी पोलिस ठाण्याला माहीती दिली  दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन घनसावंगी नगरपंचायत, अंबड नगरपरिषदेच्या आग्नीशमन दलास पांचारण करून आग आटोक्यात आणली.

सकाळ पर्यत ही आगेचा धूर सुरूच होता.  गटविकास अधिकारी अमित कदम यांच्यासह कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला या आगीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संबधीत फाईल, घरकूल संबधीत फाईल, चार संगणक, दोन प्रिंटर व इतर कार्यालयीन संबधीत फाईल,

फर्नीचर असे एकूण अंदाजे दोन लांखाचे साहीत्य व रिकार्ड पुर्णपणे जळून नुकसान केले या प्रकरणी शिपाई किसन गोपीनाथ पवार यांनी घनसावंगी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्यासह पोलिस ठाण मांडून होते दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

पंचायत समितीच्या कार्यालयास आग लागल्याचा प्रकार हा चुकीचा असून एक किंवा दोघे जण होते त्यांनी कोणत्याही प्रकारांच्या घोषणा दिल्या नसल्याने हे कोण होते याबाबत आपण सांगू शकत नाही.

- डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी घनसावंगी

आमदार टोपे यांच्या संपर्क कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

घनसावंगी येथील आमदार राजेश टोपे यांच्या संपर्क कार्यालयात काही मराठा आंदोलकांनी रात्री पेट्रोलसह घुसण्याचा व आग लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या बंगल्यावरील कर्मचारी, पदाधिकारी, वॉचमन,  पोलिसांच्या हस्तक्षेपाळे आंदोलकांना आत घुसण्याचा प्रयत्न हुकला त्याचबरोबर काही आंदोलकांनी  स्वतच्या अंगावर पेट्रोल घेऊन मराठा आरक्षणांच्या बाबतीत आमदार टोपे यांनी ठोस भूमिका घेण्याची मागणी केली.

मंगळवार (ता.३१) दुपारी पुन्हा जमावाने कार्यालयावर दगडफेकीचा प्रकार केला. पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मध्यस्थीने आंदोलकांनी माघार घेतल्यानंतर त्यांनी परत फिरणे पसंत केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.