सरकारची भावना मला माहीत नाही मी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे
Maratha Reservation jarange patil sakal

Maratha Reservation: सरकारची भावना मला माहीत नाही मी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे

मोदी सरकारने गरिबांसाठी काम करावं श्रीमंतासाठी काम करणं बंद कराव
Published on

Manoj Jarange Patil : सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे, गुन्हे वापस घेणे, आदी मागणी साठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असुन रविवार ता.9 रोजी त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या वेळी पत्रकार परिषद मध्ये जरांगे यांनी सांगितले की, सरकारला चर्चा करण्यासाठी दार खुले आहे. अद्याप सरकार कडून संपर्क झाला नाही सरकारची काय भावना आहे हे मला माहित नाही.

मोदी सरकार रविवार शपथ घेत आहे या बाबत विचारले असता जरांगे यांनी सांगितले की, त्यांनी गरिबांसाठी काम करावं श्रीमंतासाठी काम करणं बंद कराव.

बीड जिल्हातील अश्लील स्टेटस बाबत जरांगे यांनी सांगितले की, कोणाची बदनामी करू नका,वाईट स्टेटस ठेऊ नका, शांतता राखा, असे अवहान जरांगे यांनी केले.निवडणुकी आधी देखील मी हेच सांगीतलं होतं एखाद्याने टाकलं असेल म्हणजे समाजाने टाकले असे नाही. सरकारकडून सध्या कोणतीही हालचाल नाही.सरकारची भावना मला माहित नाही.

सरकारची भावना मला माहीत नाही मी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू ; ‘...तर विधानसभेच्या २८८ जागा लढविणार’

लढणं माझं काम आहे,सरकार मुद्दामहून दुर्लक्ष करत असेल,आम्हाला भेटायला कधी यायचं हे सरकार ठरवेल,असंच ते करत राहिले तर विधानसभेला घरी बसतील असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे,सध्या शेतीची कामे करा,अंतरवाली सराटी येथे येऊ नका मी येथे लढण्यासाठी खंबीर आहे सरकारला चर्चा साठी येण्यास वेळ नसेल तर त्यांनी मुंबई मधुन निर्णय घ्यावा अंबड च्या प्रभारी तहसीलदार यांच्याकडे मी माझ्या मागण्यांवर ठाम असल्याचे त्यांना सांगितलं आहे

मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण झाली,गेवराई, बीड, रायमोह,माजलगाव, आदी ठिकाणी जातीयवादाच्या नावाखाली हाणामारी सुरू आहे गृहमंत्री आणि बिडच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनांना आवर घालावा , खोट्या गोष्टींच्या नावाखाली मराठा समाजला त्रास देऊ नका मराठा समाजाने शांत राहावे,नरड्याला लागेपर्यंत सहन करू पण आम्ही सतत अन्याय सहन करणार नाही,मराठ्यांच्या मुलांनी शांत राहावे, नेकनूरला पिरावर चादर चढवली आहे,मला हिंदू धर्माचा गर्व आहे मुस्लिम बांधवांना त्यांच्या धर्माचा अभिमान असावा,मि कट्टर हिंदू पण औरंगजेबाच्या कबरेवर ही चादर चढवली असा व्हिडीओ व्हायरल केला जातोय हे चुकीचं आहे.

सरकारची भावना मला माहीत नाही मी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे
Manoj Jarange News: '...तर विधानसभेला नावं घेऊन', मनोज जरांगेंचा थेट शिंदे-फडणवीसांना इशारा

सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं राजकारण हा आमचा मार्ग नाही पण नाही दिलं तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. रविवार ता.9 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सुखापुरी येथील वैघकिय अधिकारी डॉ. शितल शिनगांरे डॉ. संतोष मुंजाळ, समुदाय आरोग्य अधिकारी कैलास वराडे यांनी जरांगे यांची आरोग्य तपासणी केली.

सरकारची भावना मला माहीत नाही मी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे
Manoj Jarange: 'नाव घेऊन विधानसभेला उमेदवार पाडणार'; मनोज जरांगेंचे आमरण उपोषण पुन्हा सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.