Maratha Reservation: 'पाणी घ्या... पाणी घ्या... जरांगे साहेब पाणी घ्या; आंतरवालीत ग्रामस्थांची जोरदार घोषणाबाजी', मनोज जरांगे झाले भावूक

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाले आहेत. तर काही भागात शांततेत आंदोलन सुरू आहे, दरम्यान आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगे यांची प्रकृती अधिक खालवल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. आज त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली.

दरम्यान आज जमलेल्या सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली, त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले “पाणी पिण्याचा हट्ट केला, तर आरक्षण कसं मिळणार? तुमची माया मला कळतेय. मी पाणी प्यायलो तर लेकरांना कसा न्याय मिळेल. मी या समाजाला माय-बाप मानतो हे खरं आहे. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या. पण तुम्ही जर असा हट्ट धरला, तर आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही, असं जरांगे म्हणाले आहेत.

Maratha Reservation
NCP Political Crisis: शरद पवार गटातर्फे ४ लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगात आज सादर केली जाणार

'जाणुन-बुजून मराठ्याच्या लेकरावर अन्याय केला जातो असं मला वाटतं”, असंही ते पुढे म्हणाले आहेत. शरीरात ताकत नसल्याने मनोज जरांगे पाटील आज झोपूनच उपस्थितांशी संवाद साधला.

Maratha Reservation
Maratha Reservation: "झटकन हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही कारण..", मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी

पुढे ते म्हणाले की, एकाच्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण समाजाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून मी इथे बसलो आहे, मला तुमची माया कळते, पण, तुम्ही जर असं हात जोडले तर लेकरांना न्याय कसा मिळेल. मला वाटतं मी माझ्या समाजाचा शब्द डावलतं नाही आणि डावलणार नाही, पण, मला या समाजापेक्षा कोणी मोठं नाही, तुम्ही हट्ट करू नका, न्याय मिळायचे दिवस जवळ आले आहेत, असं जरांगे म्हणाले, त्यानंतर ग्रामस्थांनी पाणी पिण्याची एकत्रित विनंती केली, त्यानंतर जरांगे पाटलांनी मी थोड्या वेळाने पितो असं म्हटल्यानंतर ग्रामस्थांनी घोषणा देण्याच सुरूवात केली , तेव्हा मनोज जरांगे यांच्या डोळ्यात पाणी आले, यावेळी ते भावूक झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.