वडीगोद्री (जि. जालना) - ‘शेती, शिक्षण, नोकरी, आरक्षण आदी प्रश्न भेडसावत आहेत. ते सुटत नाहीत. सत्ताधाऱ्यांकडून लाठ्याकाठ्या खाण्यापेक्षा सत्तेत बदल करू.
यासाठी राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते, जनता, वंचित घटकांनी एकत्र यावे,’ असे असे आवाहन मनोज जरांगे यांनी मंगळवारी केले. आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर शासन निर्णयाची २९ ऑगस्टपर्यंत वाट पाहू, असे त्यांनी सांगितले.
अंतरवाली सराटी येथे जरांगे म्हणाले, ‘फडणवीस यांच्या हातात राज्य आहे. त्यांनी ठरवले तर एका दिवसात ते आरक्षण देऊ शकतात. मुळात त्यांना आरक्षण द्यायचे नाही.’