'मुस्लिमांनाही ओबीसीमधून आरक्षण द्या, उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका'; मनोज जरांगे आक्रमक

Reservation to Muslim : सरकार आरक्षण देत नसेल तर १८० नंतर ज्या जाती लावल्या त्या सर्व जाती काढा. १९९४ ला दिलेले आरक्षण रद्द करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
 manoj jarange
manoj jarange
Updated on

जालना- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही ते सरकारला द्यायला तयार आहोत. सरकारने ८३ क्रमांकाला मराठा नावाने १८० जातींमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे मराठे आणि कुणबी एकच आहेत. सरकार आरक्षण देत नसेल तर १८० नंतर ज्या जाती लावल्या त्या सर्व जाती काढा. १९९४ ला दिलेले आरक्षण रद्द करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठा जातीला घेतलं नाही मग इतर जातींना का घेतलं आहे? दुसऱ्या जातींना त्यांच्या व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं. आम्ही आमचा व्यवसाय देखील दाखवतो. त्यामुळे आम्हाला देखील आरक्षण मिळावं. मुस्लीम, लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण यांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे. त्यांच्यावर अन्याय का? कायद्यानं वागणार असाल तर कायदयानेच वागा, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.

 manoj jarange
Chhagan Bhujbal : लोकसभा, विधानसभेतही OBC ला आरक्षण पाहिजे, भुजबळांकडून मोठी मागणी; वडीगोद्रीमध्ये तोफ डागली, म्हणाले...

आमच्या पाठित खंजीर घुपसण्यात आला. इतके दिवस आम्ही भाऊ म्हणून वागत राहिलो. कोणताही आधार नसताना तुम्ही आरक्षण घेत राहिलात. पण, मुस्लीम, बाह्मण, लिंगायत यांच्या नोंद कुणबी म्हणून आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण का देण्यात येत नाही. नोंदी नसताना बोगस आरक्षण देण्यात आलं. घटनेने दिलेले सोडून सर्व आरक्षण रद्द करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.

 manoj jarange
Maratha Reservation : 'मराठ्यांचं कुणबीकरण करून त्यांना पाठीमागील दाराने OBC आरक्षण देण्याचा सरकारचा घाट'

त्यांना आरक्षण देण्याचे निकष आम्हाला सांगा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू. सगेसोयऱ्यांना आरक्षण द्या. वाशीतील गुलालाचा अपमान करू नका. जर अपमान झाला तर विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसेल. आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. यावेळी अनेक नेते होते. आम्ही वाशीत मुक्काम केला. सरकारवर विश्वास ठेवला. मी एकट्याने निर्णय घेतलेला नाही. माझ्या मागण्या वाढलेल्या नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com