Maratha Reservation: मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात! आजपासून करणार राज्याचा दौरा

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत
Manoj Jarange
Manoj JarangeEsakal
Updated on

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून राजकारणही चांगलंच तापल्याचं दिसून आलं. मराठा आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. ते आजपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आजपासून (15 नोव्हेंबर) त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

मनोज जरांगेंची आज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 येथे सभा पार पडणार आहे. तब्बल 125 एकर शेतामध्ये या सभेची तयारी करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील या सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange
Maratha Reservation: "७५ वर्षात मराठा आरक्षणासाठी कुणी काय केलं हे..."; मनोज जरांगे यांचा इशारा

कसा असेल दौरा?

१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा

१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी

१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड

१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड

१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी

२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण

२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,

२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर

२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.

Manoj Jarange
Manoj Jarange: 'आज रूग्णालयातून डिस्चार्च, दोन दिवस आराम अन् राज्यभर दौरे....', मनोज जरांगेंची रणनिती ठरली!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.