जिंतूर - राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या सगेसोयरे अध्यादेश काढून अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणास्तव हात व पायावर लिहून जिंतूर तालुक्यातील वाघी-धानोरा येथील एका पंचवीस वर्षीय मराठा युवकाने बुधवारी (ता.२०) सकाळी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गजानन लिंबाजीराव बोराडे असे आत्महत्याग्रस्त युवकाचे नाव आहे.
गजानन बोराडे हा मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याने समजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असे. यातच राज्य शासनाकडून सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने होत नसल्याने नैराश्य आलेल्या गजानन याने आपण स्वतःचे जीवन संपवत असल्याचे हाता-पायावर लिहून शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी वसंत वाघमारे,सुनीलकुमार वासलवार,अमलदार शेख जीलानी यां सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.