Maratha Reservation : सकाळच्या तीन तासातच परभणी जिल्हयातील एसटीला १३ लाख रुपयांचे नुकसान

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने रविवारी दुपारपासून जिल्हयातील एसटी बससेवा बंद केली आहे.
st bus
st bussakal
Updated on

परभणी - मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने रविवारी दुपारपासून जिल्हयातील एसटी बससेवा बंद केली आहे. सोमवारी (ता.३०) सकाळच्या ५ ते ८ या तीन तासातच एसटीच्या ४१७ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने एसटीला तब्बल १३ लाख ४३ हजार १९० रुपयांचे नुकसान झाले आहे.

एसटी महामंडळाच्या परभणी विभागातंर्गत सात आगार येतात. या आगारातून दररोज हजारो किलोमिटरसाठी एसटी धावत असते. परंतू, रविवारी (ता.२९) मराठा आरक्षणांचे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता लक्षात घेता एसटी महामंडळाच्या प्रशासनाने विभागातंर्गत येणाऱ्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एसटी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

बीड, लातूर व नांदेड जिल्हयात बसवर दगडफेकीच्या घटना घडल्याने एसटी ने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला होता. सलग दुसऱ्या दिवशीही सोमवारी (ता.३०) बससेवा बंद ठेवण्यात आली. सकाळी ५ वाजल्यापासून एसटीची सेवा सुरु होते. त्यात पहिल्या तीन तासाच एसटीला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

एसटीच्या विशेष नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी आगारातील सुरवातीच्या तीन तासात ४८ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या आगाराला १ लाख ९५ हजार ७८० रुपये, जिंतूर आगारातील ७८ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या बसफेऱ्याला ५ लाख ८३ हजार २८४ रुपये, हिंगोली आगारातील ९६ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या आगाराला १ लाख ८३ हजार ९० रुपये नुकसान सहन करावे लागले.

गंगाखेड आगारातील ६४ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे १ लाख ६३ हजार २०० रुपये नुकसान झाले आहे. पाथरी आगारातील ८२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ७ लाख ३० हजार १२८ रुपये नुकसान झाले आहे. वसमत आगारातील ३० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ लाख ७० हजार २२० रुपये नुकसान झाले आहे.

कळमनुरी आगारातील १९ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या असून त्यामुळे ८८ हजार ३१२ रुपये नुकसान झाल्याचे एसटीच्या सुत्रांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.