Maratha Reservation : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली सवाद्य अंत्ययात्रा

लाखोंचे मोर्चे, आंदोलन करूनही आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
Funeral procession of symbolic statue of leaders
Funeral procession of symbolic statue of leaderssakal
Updated on

लोहारा (जि. धाराशिव) - लाखोंचे मोर्चे, आंदोलन करूनही आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. लोहारा तालुक्यातील धानुरी येथील सकल मराठा बांधवांनी मंगळवारी (ता. ३१) पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार कण्यात आले. विशेष म्हणजे या प्रतिकात्मक अंत्यसंस्कार सोहळ्यास जवळपास दोन हजारपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.

मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज बांधव आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी लाखांचे मोर्चे, आंदोलन केले. परंतु, राज्य सरकारने याची ना दाद, ना फिर्याद घेतली. अखेर मराठा योध्दा मनोज जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू करून आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आहे. परंतु, उपोषणामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे.

असे असतानाही राज्य सरकार ठोस भूमिका घेऊन आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यास चालढकल करीत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजामध्ये सरकार व राजकीय पुढाऱ्यांविरोधात तीव्र लाट उसळली आहे. लोहारा तालुक्यातील धानुरी येथील मराठा बांधवांनीही दोन दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी गाव बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर गावातील तरूण आक्रमक होत त्यांनी मुंडण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडणवीस, अजित पवार, उमरगा-लोहाराचे आदार ज्ञानराज चौगुले, मदानारायण राणे, छगन भुजबळ, रामदास कदम, बबनराव शिंदे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेची सामूहिक अंतयात्रा काढली.

यावेळी हलगीच्या निनादात व फटाक्यांची आतषबाजी करीत ही अंतयात्रा थेट स्मशानभूमीत पोहचली. त्यानंतर मंत्रोच्चार करून प्रतिकात्मक प्रतिमेस भडाग्नी देऊन नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.