आईला पाहताच मनोज जरांगेंना अश्रू अनावर...म्हणाले, जीव गेला तरी चालेल पण मराठ्यांची मान झुकवणार नाही

Maratha Reservation Protest
Maratha Reservation Protest
Updated on

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे गेल्या ११ दिवसांपासून उपोषण करत आहेत. १ सप्टेंबरला पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्यानंतर हे प्रकरण पेटले. महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान काल सरकारने आरक्षणासंदर्भात जीआर काढला पण त्यात जरांगे यांनी सुधारणा सांगितल्या. 

सुधारित जीआर आल्यानंतर उपोषण मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज मनोज जरांगेंचे कुटुंबीय आंदोलनस्थळी आले. आई उपोषणस्थळी आल्याने जरांगेंना अश्रू अनावर झाले. (latest marathi news)

मनोज जरांगे म्हणाले, मी माझ्या समाजाचं, या गावाचं, जन्मभूमीचं भल करण्यासाठी माझा जीव पणाला लावला. पुढच्या काळातही लावणार आहे. आज माझ्यासाठी मराठा समाज घराघरातून पेटून उठला आहे. जर न्याय आणि दान द्यायचं असेल तर मराठा पोरांच्या पाठीमागे उभं राहीलं पाहिजे.

हा महाराष्ट्र पेटून उठला आहे. महाराष्ट्रातील मराठा माता माऊल्यांना मला सांगायचे आहे. आरक्षणासाठी तुमचे मुदडे पडले पण आता मी ते होऊ देणार नाही. जीव गेला तरी चालेल पण मराठ्यांची मान खाली जाऊ देणार नाही. माझ गाव कुलूपबंद करुन इथं येत आहे. माझी छाती भरून गेली आहे. मी हे उपकार कधी विसरणार नाही, असे जरांगे म्हणाले. 

Maratha Reservation Protest
Phone Tapping Case: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना क्लीनचिट; मुंबई हायकोर्टानं नोंदवलेले दोन्ही FIR रद्द

मराठवाड्यात राहणाऱ्या मराठा समाजातील ज्यांच्याकडे निजामाच्या राजवटीत महसूल आणि शैक्षणिक नोंदी असतील आणि कुणबी जातीचा उल्लेख असेल त्यांना प्रमाणपत्रे देण्यात येतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. महाराष्ट्राचा भाग होण्यापूर्वी मराठवाडा प्रदेश निजामशासित हैदराबाद राज्याच्या अंतर्गत आला होता. (Maratha Reservation news)

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, जीआर जारी करण्यात आला आणि आदेशाची प्रत घेऊन अर्जुन खोतकर उपोषस्थळी गेले होते. मात्र जरांगे यांनी असा युक्तिवाद केला की आरक्षणाच्या लाभांचा न्याय्य सरसकट द्यावा. वंशावळीची अट काढून टाकावी, असे मनोज जरांगे म्हणाले. 

Maratha Reservation Protest
G20 Summit: दिल्लीत जगातील शक्तिशाली नेत्यांची मांदियाळी! कोण येणार, कोण नाही? जाणून घ्या संपूर्ण यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()