वडीगोद्री - अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाला ता. 29 ऑगस्ट 2023 रोजी सुरवात झाली होती. गुरुवार ता. 29 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्ष पुर्ण झाल्याने अंतरवाली सराटी येथे गुरुवार ता. 29 रोजी मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये संवाद मेळावा संपन्न झाला. या वेळी बोलतांना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री भुजबळ, आमदार दरेकर, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिका केली.