Marathawada Health News: मराठवाड्यासाठी महत्वाची बातमी, आष्टीत होणार उपजिल्हा रुग्णालय!

New Hospital In Ashti: १०० खाटांचे रुग्णालय, मुख्य इमारत व अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांना मान्यता
Marathawada Health News: मराठवाड्यासाठी महत्वाची बातमी, आष्टीत होणार  उपजिल्हा रुग्णालय!
Updated on

Beed Latest Update: ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले असून राज्य शासनाने मुख्य इमारतीसह अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामास बुधवारी (ता. तीन) मंजुरी दिली. या कामांसाठी एकूण ८८.३४ कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आष्टी येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय असून लोकसंख्येचे विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती. त्यामुळे आष्टी येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयत झाल्यास आरोग्याच्यादृष्टीने मोठी समस्या दूर होणार असल्यामुळे आष्टी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती.

Marathawada Health News: मराठवाड्यासाठी महत्वाची बातमी, आष्टीत होणार  उपजिल्हा रुग्णालय!
Girish Mahajan : वयोमर्यादेबाबत गृहमंत्र्यांशीबोलून मार्ग काढला जाईल; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आश्‍वासन

या साठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून मंजुरीसाठी प्रयत्न केले. आॅक्टोबर २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कॅबिनेट बैठकीमध्ये आष्टीचा उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली. त्यानुसार कासारी हद्दीतील शासनाच्या गायरान जमिनीपैकी बेलगाव रस्त्यावरील स.नं. १४९ मध्ये दोन हेक्टर ४० आर (सहा एकर) जागा शासनाने उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली आहे.

या जागेत मुख्य इमारतीसह अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांची बांधकाम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने परिगणित केल्याप्रमाणे व उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८८.३४ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास बुधवारी (ता. तीन) प्रशासकीय मान्यता दिली.

Marathawada Health News: मराठवाड्यासाठी महत्वाची बातमी, आष्टीत होणार  उपजिल्हा रुग्णालय!
Girish Mahajan : स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठीचे नियोजन करा; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

दुमजली मजली प्रशस्त इमारतीतून मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा

उपजिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत सुमारे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये दुमजली बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या शेजारीच वर्ग-१ कर्मचा-यांसाठी १२, वर्ग-दोन अधिकारी यांच्यासाठी १२ व वर्ग-तीन कर्मचा-यांसाठी आठ अशी ३२ निवासस्थाने तीन मजली इमारतीमध्ये बांधण्यात येणार आहेत. प्रशस्त अशा उभारण्यात येणा-या इमारतीमधून आष्टी मतदारसंघातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

Marathawada Health News: मराठवाड्यासाठी महत्वाची बातमी, आष्टीत होणार  उपजिल्हा रुग्णालय!
Jalgaon Girish Mahajan : खासदारकीत काम चांगले; मग उमेदवारी का नाही? : गिरीश महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.