Marathwada: सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Cha. Sambhaji Nagar: चिखलात केली बसून केलेल्या आंदोलनामुळे साबळे पुन्हा चर्चेत आले आहे.
सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण
Marathwada sakal
Updated on

Fulambri: फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी व गायगोटे शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरीचे व गाय गोयगोठ्याचे बांधकामही पूर्ण केले आहे.

परंतु कामे पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्याने गेवराई पायगा येथील चर्चेत राहणारे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी चक्क चिखलात बसून मंगळवारी (ता.सहा) आंदोलन केले आहे.त्यामुळे चिखलात केली बसून केलेल्या आंदोलनामुळे साबळे पुन्हा चर्चेत आले आहे.

सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण
Marathwada News : महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ऑनलाईन सर्वर ठप्प; पन्नास गावातील खातेदार त्रस्त...

फुलंब्री तालुक्यात 93 गावाच्या माध्यमातून 56 हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप लागवड असून मोठ्या प्रमाणात दरवर्षी शेतकरी खरिपाची लागवड करतात. परंतु कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ राहत असल्याने शेतकरी अडचणीत सापडतो.

त्यामुळे शासनाच्या वतीने पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक सिंचन विहीर व जनावरांसाठी गाय गोठे ही योजना शासनाकडून राबवली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सिंचन विहिरी व गाय गोठे मंजूर केले जाते.

मंजूर करताना मोठ्या प्रमाणात टक्केवारी शेतकऱ्याकडून घेतली जाते. परंतु सदरील शेतकरी लाभार्थ्यांनी गाय गोठा व सिंचन विहीरीचे बांधकाम पूर्ण करूनही वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील नेहमी चर्चेत राहणारे सरपंच मंगेश साबळे यांनी गावातून जाणाऱ्या चिखलातील रस्त्यावरच बसून थेट आंदोलन केले.

सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण
Marathwada News: टेलरने वेळेवर ब्लाऊज दिला नाही, महिला ग्राहक मंचात; बसला मोठा दंड

या आंदोलनात साबळे यांनी मुख्यमंत्री व सरकारकडे कुशल कामाच्या पैशाची मागणी केली आहे. वर्ष वर्ष शेतकऱ्यांना बांधकामे पूर्ण करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू लागला आहे. त्यामुळे मंगेश साबळे यांनी चिखलात बसून आंदोलन केल्याने पुन्हा हा चर्चेचा विषय ठरला आहे.

चिखलात बसून अनोखी आंदोलन

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील मंगेश साबळे नेहमीच आपल्या आंदोलनाने राज्यभर प्रसिद्ध झालेले आहे. प्रसिद्धी माध्यमांनाही त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची नेहमी दखल घ्यावी लागते. मंगळवारी गेवराई पायगा येथील रस्त्यावरच सरपंच मंगेश साबळे हे चिखलात बसून कुशल कामाचे पैशाची मागणी केल्याने हे अनोखे आंदोलन पुन्हा चर्चेत आले आहे.

सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण
Marathwada: तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप, वाचा नक्की काय झाले?

सरकार रोजच नवनवीन योजना काढत आहे. मात्र मागील दोन वर्षापासून एकाही कामाचे बिल अजून पर्यंत निघालेले नाही. सिमेंट रस्ते, शेततळे, विहीर, गाय गोठा, पेवर ब्लॉक, पूर्ण केलेल्या कामाचे पैसे द्या, मग पुढील नवीन योजना सुरू करावी. शेतकऱ्यांनी कर्ज काढून कामात पैसे टाकलेले आहेत. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी.

- मंगेश साबळे, चर्चेतील सरपंच गेवराई पायगा

सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण
Marathwada Tour : इतिहासात रमायला आवडतं? मग ही आहेत तुमच्यासाठीची महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.