Bidkin News: येथील बिडकिन ते शेकटा रोडवर गस्त घालत असताना वनविभागाच्या वतीने एका अवैध लाकुड वाहतुक करणारे ट्रकवर कार्यवाही करण्यात आल्याची घटना ता. (०६) मंगळवारी उशिरा झाली आहे.
वनपरीक्षेत्र अधिकारी स्ट्राइक फोर्स छत्रपती संभाजीनगर एस. जी. नांदवटे व त्यांच्या अधिनीस्त कर्मचारी बिडकीन ते गिधाडा शेकटा रोडवर रात्रगस्त करीत असताना एक वाहन क्र. KA- 56 1454 हे अवैध लाकुड वाहतूक करीत असताना पकडले सदर वाहन चालक आदम पटेल याच्या कडे कोणत्याही प्रकारचा लाकुड वाहतूक परवाना नसल्याने सदरचे वाहन मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
वन गुन्हा जारी करण्यात आला तसेच सदरचे वाहन चालक आरोपी नामे आदम पटेल दस्तागीर पटेल,वय.४० वर्षे ,राहणार रोला,तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 व 42 आणि 52 महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे नियम-3, महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम-31 (1) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील वाहन हे पटेल साँ मिल बिडकीन या ठिकाणी पुढील चौकशी कामी ठेवण्यात आले आहे अशी माहिती कार्यवाही अधिकारी प्रविण कांबळे यांनी दिली आहे.
सदरची कार्यवाही वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर हनुमंत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तसेच उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर सुर्यकांत मंकावार व विभागीय वन अधिकारी (नियोजन) छत्रपती संभाजी नगर टेमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी स्ट्राइक फोर्स छत्रपती संभाजीनगर एस.जी. नांदवटे, वनपाल मनोज कुमावत, वनपाल प्रवीण कांबळे, वनरक्षक माधव तोटेवाड, वनरक्षक अनिल जाधव यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.