Maratha Reservation : प्रशासनाला आढळल्या २६ हजार कुणबी नोंदी; मराठवाड्यात दोन कोटी कागदपत्रांची तपासणी

मराठवाड्यात तब्बल २ कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जवळपास २६ हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
Maratha Reservation Kunbi registration
Maratha Reservation Kunbi registrationesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात तब्बल २ कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जवळपास २६ हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. ही सर्व माहिती महसूल प्रशासनाने न्या. शिंदे समितीला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने मराठवाड्यातील जुन्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे समिती स्थापन केली. पुढे या समितीला राज्यभर नोंदी तपासण्याची जबाबदारी देण्यात आली. या समितीने विविध विभागातील जुन्या नोंदीची तपासणी केली.

या कागदपत्रांची तपासणी

प्रशासनाने तपासणी केलेल्या कागदपत्रांमध्ये १८९१ ची जनगणना, खासरापत्र, पाहणीपत्र, क- पत्रक, कुळ नोंदवही, १९५१ चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्कनोंद पत्र, फेरफार पत्र, ७/१२, गाव नमुना, प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, पोलिसांचे क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील १३ प्रकारचे दस्तावेज, भूमी अभिलेखमधील ७ दस्तावेज, मुंतखब आदी अभिलेख तपासण्यात आले. काही नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोंदीचे कागदपत्र प्रशासनाला सादर केले.

राज्याचे काम मात्र सुरूच

राज्य शासनाने सुरवातीला मराठवाड्यातील मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी न्या. संदीप शिंदे समिती स्थापन केली होती. मात्र आता या समितीला राज्यातील नोंदीची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण काम झाल्यानंतर ही समिती राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे.

नोंदींचे डिजिटायझेशन

प्रशासनानेही मिळालेल्या नोंदीचे डिजिटायझेशन करून वेबसाइटवर अपलोडही करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र वाटपालाही सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात प्रशासनाने जवळपास २ कोटी कागदपत्रांची तपासणी केली असून त्यातून साधारण २६ हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या तपासणीचा अहवाल नुकताच न्या. शिंदे समितीला सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.