औरंगाबाद : कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने मराठवाड्यात रुग्णसंख्येतही घट झाली. शनिवारी (ता. १७) दिवसभरात आठ जिल्ह्यांमध्ये ७४४ रुग्णांची भर पडली तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात ८ जणांना मृत्यू
औरंगाबाद ः जिल्ह्यात शनिवारी २५७ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ४५६ झाली आहे. आजपर्यंत एकूण १० हजार २८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण २ हजार ०७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लातूरमध्ये ८३ नवे रुग्ण
लातूर : जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) ८३ कोरोनाचे रूग्ण आढळून आले तर चार रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दिवसभरात झालेल्या १६६ आरटीपीसीआर तपासणीत ३६ तर ५२१ रॅपीड अँटीजेन तपासणीत ४७ पॉझिटिव्ह दिसून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार ३५४ वर तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५६८ वर गेली आहे. दरम्यान सध्या उपचार सुरू असलेल्या एक हजार २८८ रुग्णांपैकी तब्बल ६९४ रुग्ण घरूनच कोरोनाशी लढा देत असून, ५९४ रूग्ण सरकारी यंत्रणेच्या सुविधेत उपचार घेत आहेत. यात कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या २६२ रुग्णांच्या अडीचपट रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
नांदेडला चार बाधितांचा मृत्यू
नांदेड ः जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, दिवसभरात औषधोपचारानंतर १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता १७ हजार ९८७ झाली आहे. बाधित रुग्णांपैकी ४७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, चार जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून त्यामध्ये उज्वलनगर नांदेड पुरुष (वय ६१), बेलानगर नांदेड पुरुष (वय ६६), अर्धापूर पुरुष (वय ६५) आणि कांडली (ता. हिमायतनगर) येथील महिला (वय ७५) यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४८० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात एकाचा मृत्यू
परभणी ः दिवसभरात एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या २५५ झाली आहे. आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग सहा हजार २३१ रुग्णांना झाला आहे. त्यापैकी पाच हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांपैकी २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात २० नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर ३८ जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये ३२४ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
हिंगोलीत एकाचा कोरोनामुळे मृत्यू
हिंगोली ः शहरातील आनंदनगर येथील ६७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी (ता. १७) मृत्यू झाला. दिवसभरात नव्याने २६ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. ४६ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. दिवसभरात २४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण दोन हजार ९४८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी दोन हजार ७०५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. सध्या १९७ रुग्णांवर उपचार चालु आहेत.
जालन्यात ९२ रुग्णांची भर
जालना ः जिल्ह्यात शनिवारी ९२ नव्या रुग्णाची भर पडली. दिवसभरात १०३ रुग्ण कोरोनातून बरे झाले. जिल्ह्यात आता एकूण कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ७९० झाली असून, त्यापैकी ७ हजार ६३३ रुग्ण बरे झाले आहेत.
उस्मानाबादेत ५९ नव्या रुग्णांची भर
उस्मानाबाद ः जिल्ह्यात शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाला तर १०३ रुग्ण बरे झाले. ५९ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंत १२ हजार ३४७ रुग्ण बरे होऊन घरी गे
बीडमध्ये ११७ रुग्ण
जिल्ह्यात शनिवारी ११७ रुग्णांची भर पडली तर १३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३ हजार ७८० झाली. त्यापैकी १२ हजार ३४७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला. ९८५ जणांवर उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.