Corona Updates: २४ तासांत मराठवाड्यात ३०९ जणांना कोरोनाची बाधा

बीडमध्ये सहा, औरंगाबाद तीन तर हिंगोली-जालन्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
covid 19
covid 19covid 19
Updated on

औरंगाबाद: मराठवाड्यात रविवारी (ता.चार) दिवसभरात कोरोनाचे ३०९ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येत बीड १५९, उस्मानाबाद ५२, लातूर ३९, औरंगाबाद २५, परभणी १६, जालना ११, नांदेड ७, हिंगोली ० समावेश होतो. उपचारादरम्यान आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात बीडमध्ये सहा, औरंगाबाद तीन तर हिंगोली-जालन्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

औरंगाबादेत २५ बाधित
औरंगाबाद जिल्ह्यात २५ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील ११, ग्रामीण भागातील१४ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ३९९ वर पोचली. आणखी ९६ रुग्ण बरे झाले. यात शहरातील १३ तर ग्रामीण भागातील ८३ जणांचा समावेश आहे.

covid 19
परवान्याशिवाय चालवूच नका वाहन! तर होईल आयुष्य उद्ध्वस्त

आजपर्यंत १ लाख ४२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. ५३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी तिघांचा मृत्यू झाला. म्हस्की (ता. वैजापूर) येथील पुरुष (वय ५०), गारखेडा येथील महिला (७०), किनगाव (ता. फुलंबी) येथील महिलेचा (८०) घाडी रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत तीन हजार ४४० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.