Latest Crime News: कुटुंबात मुलगा हाच वंशाचा दिवा मानला जातो. अशा विचारसरणीला छेद देणारे एक कुटुंब भूम तालुक्यातील सोनगिरी या लहान गावात पाहायला मिळते. दोन्हीही मुलींना शिकवण्याची हाकीम कुटुंबाची धडपड सुरू आहे. झाकीर हाकीम आपल्या अपंग मुलींना शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत.
व्यवसायाने शेतकरी असलेल्या झाकीर यांना एकरभर शेती आहे. यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी रोशनी (वय १८), तर तमन्ना (वय १४) या दोन्हीही मुली अपंग आहेत. रोशनी दोन्ही पायांनी अपंग आहे. तिला दुचाकीवर बसताही येत नाही, तर चारचाकी गाडीत बसण्यासाठी वेळ लागतो. तर लहान मुलगी तमन्नाला वाचादोष आहे. तिला ऐकू येते, पण बोलता येत नाही. परंतु, त्या दोन्ही
अभ्यासात हुशार आहेत, हे ओळखून आई-वडील या दोन्ही मुलींना शिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोठी मुलगी शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे कला शाखेच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे, तर तमन्ना ही ईकरा उर्दू शाळा, भूम येथे सातवी इयत्तेत शिकत आहे.