Marathwada : हिंदू मुस्लिम ऐक्याची औसेकरांची परंपरा हणमंत थोरात यांनी जपली

औशातील इज्तेमाला हिंदूने दिले पाणी
Marathwada NEWS
Marathwada NEWSesakal
Updated on

Marathwada : औसा - लातूर- औसा राष्ट्रीय महामार्गालगत मुस्लिम समाजचा तालुकास्तरीय दोन दिवसांचा इज्तेमा शुक्रवार पासून सुरू झाला आहे. या इज्तेमा ठिकाणी तालुक्यातील जवळपास दहा हजार मुस्लिम बांधव उपस्थित आहेत. या सर्वांना वजू, तहारत आणि इतर गोष्टींसाठी पाण्याची नितांत गरज होती. इज्तेमा कमिटीचे जबाबदार लोकांपुढे पाणी कसे उपलब्ध करायचे हा मोठा प्रश्न होता.

टँकरने पाणी आणायचे नियोजन असतांना इज्तेमास्थळाच्या जवळ शेती आणि घर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किसानसभा तालुकाध्यक्ष हणमंत थोरात यांनी इज्तेमा कमिटीच्या लोकांची भेट घेऊन त्यांच्या विहिरीवरून लागेल तेवढे पाणी घेऊन जाण्याची परवानगी दिली. यव्हडेच नाही तर इज्तेमास्थळाच्या बाजूपर्यंत असलेली त्यांची पाईपलाईन इज्तेमासाठी वापरायला दिली. एका कट्टर हिंदू व्यक्तीने मुस्लिम समाजासाठी पाणी उपलब्ध करून देऊन औशातील हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्याची परंपरा जपली आहे.

Marathwada NEWS
Kitchen Tips : इलेक्ट्रिक किटलीत फक्त चहाच नाही, तर या गोष्टीही करता येतात!

मुस्लिम समाजाच्या इज्तेमासाठी सर्वात महत्त्वाचा घटक पाणी आहे. औसा तालुक्यातील तालुकास्तरीय इज्तेमा शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी होत आहे. या इज्तेमाला पाण्याची सोय करण्यासाठी कमिटीचे लोक टँकरने पाणी आणण्याचे नियोजन करीत होते. ही गोष्ट इज्तेमा जवळ शेत आणि घर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हणमंत थोरात यांना समजली त्यांनी तात्काळ या कमिटीच्या लोकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या विहिरीवरून व पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जाण्याची परवानगी दिली.

Marathwada NEWS
Weight Loss Tips : डेअरी प्रोडक्ट खाऊन वजन वाढणार नाही तर कमी होणार, सुटलेली ढेरी कमी करण्याचा हा आहे बेस्ट फॉर्म्युला

समाजामध्ये हिंदू मुस्लिम धर्मात वाद लावून आपली राजकीय पोळी भाजणारे अनेक आहेत. मात्र स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर कार्यकर्ता असूनही मुस्लिम इज्तेमाला पाणी उपलब्ध करून देऊन माणुसकी आणि सर्वधर्मसमभाव जपणारे हणमंत थोरातसारखे खूप कमी दिसून येतात. यांचा आदर्श सर्वांनी घेतला तर भारतात हिंदू मुस्लिम वादच राहणार नाही.

Marathwada NEWS
Parenting Tips : वारंवार समजावून देखील मुले वाद घालतात?मग, 'या' ट्रिक्सचा वापर करून मुलांना लावा वळण

"देव सर्वांचा एकच आहे. मुस्लिम कुराण पठण करतात आम्ही गीता वाचतो. दोन्हींचा सार हा मानवधर्म जोपासण्याचा आहे. माझे अनेक मुस्लिम व्यक्तींशी कौटुंबिक नाते आहे. माझ्या सुखदुःखात ते सहभागी होतात. माझ्याही धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. परमेश्वराची आराधना करणाऱ्या लोकांना पाणी पाजणे ही अत्यंत पुण्याची गोष्ट असल्याने मी फक्त यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे. हीच संस्कृती औशाची आहे त्याला जपण्याचे काम मी केले आहे"

- हणमंत थोरात

Marathwada NEWS
Uric Acid Control Tips : युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश

" हणमंत थोरात यांनी इज्तेमाला पाणी देऊन औशाच्या हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली आहे. अल्लाह त्यांना याचा योग्य मोबदला तर देईलच पण औशातील मुस्लिम समाज त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यांना जेंव्हा जेंव्हा आमची मदत लागेल त्यासाठी आम्ही धावून जाऊ"....

- डॉ. अफसर शेख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.