पाचोड : चार शेळ्या, ५० कोंबड्यांचा मृत्यू; मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच

दावरवाडी तांडा येथील घटना : पाचोड परिसरात पावसाचा कहर सुरूच
मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच
मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूचsakal News
Updated on

पाचोड : शुक्रवारी (ता.एक) मध्यरात्रीला मुसळधार पावसाच्या जोरदार हजेरीने सर्वत्र दाणादाण उडविली असून सर्व पाचोड परिसरात सर्व शेतशिवार जलमय झाले. तसेच दावरवाडी तांडा (ता. पैठण)येथे घरात पाणी घुसल्याने पन्नासवर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या तर चार शेळ्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली.

परिसरात पावसाने शुक्रवारी (ता.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक रौद्ररूप धारण केले. प्रचंड विजेच्या कडकडाट व ढगाच्या गडगडाटात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पाचोडसह (ता.पैठण) परिसरात हाहाकार उडाला. सलग पाऊण तास जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांत पाणी होऊन गावाकडे परतणाऱ्या नागरिकांचा अन् रस्त्याचा संपर्क तुटला.

मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच
सोलापूर : दूध पंढरी कर्मचारी पतसंस्थेला १५ लाख रुपयांचा नफा

यानंतर रात्री ११.३० पासून सुरु झाल्या पावसाने मध्यरात्रीपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने परिसरात आतापर्यंत पडलेल्या पावसाचा उच्चांक मोडला गेला. पाचोड महसूल मंडळात पावसाने थैमान घातल्याने केकत जळगाव, हर्षी, थेरगाव, लिंबगाव, दावरवाडी, नांदर, दादेगाव बु., मुरमा, कडेठाण, कोळी बोडखा, वडजी, रांजणगाव दांडगा, खादगाव, आंतर वाली (खांडी), आडगाव, नानेगाव आदी भागातील उभ्या पिकांना पावसाचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे असंख्य शेतातील माती खरडून गेली. बांधही फुटून गेल्याने फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पैठण तालुक्यातील दावरवाडी तांडा येथील संतोष राठोड यांच्या घरांत पुराचे पाणी शिरल्याने येथील पन्नासवर कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या तर गोठ्यात मोकळ्या असलेल्या चार शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.