संजय बर्दापुरेवसमत / जातीयवाद , वर्णवाद, भाषावाद आणि प्रांतवाद सोडून द्या आणि अखंड हिंदूत्वासाठी एक व्हा असे आवाहन करत लोक तंत्र व्यवस्थेचा फायदा मुस्लिम समाज घेतो पण हिंदू समाज घेत नसल्याचा निराशावाद कालीचरण महाराज यांनी सोमवारी ता .१८ व्यक्त केला . .येथील बसवेश्वर मंगल कार्यालयात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रचारार्थ कालीचरण महाराज यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते .कालीचरण पुढे म्हणाले की, पुर्वी पहिल्या राणीचा पहिला पोरगाच राजा बणू शकत होता. दुसर्याला राजा व्हायचे असेल तर पहिल्याला जीवे मारावे लागत असे. मात्र आता लोकशाहीत टँलेंट आणि पक्षाच्या जोरावर शेंबडं पोट्टही राजा बणू शकते. .परंतू या व्यवस्थेचा सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाज घेतो पण हिंदू समाज घेत नसल्याचे ते म्हणाले. शेवटी हिंदूत्वासाठी गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराजांना निवडून द्या असे वसमतकरांना आवाहन केले. तात्पुरवी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचंड महाकाय रँली शहरातून निघाली.अनेक साधूसंत, शिवाचार्य महाराज व मोठ्या संखेने महिला या रँलीत उपस्थित होते. ठिकठिकाणी रँलीवर फुलांचा वर्षाव केला गेला. कालीचरण महाराजांना पोलीसांनी परवानगी न दिल्याने त्यांना रँलीत सहभागी होता आले नाही. .त्यांना थेट सभेच्या ठिकाणी यावे लागले. यावेळी करबसव शिवाचार्य महाराज, वेदांतचार्य डिगांबर शिवाचार्य महाराज यासह विविध ठिकाणचे शिवाचार्य महाराजांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन गजानन भोकरे यांनी केले. आभार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी मानले. सभेला मतदार नागरीकांची प्रचंड गर्दी होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.