बीड : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करताना पुढील २५ वर्षांच्या विकासाचे नियोजन करण्यावर शासनाचा भर आहे. जिल्ह्याचा समतोल विकास करताना पायाभूत सुविधांसह प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शनिवारी मुख्य शासकीय ध्वजवंदन पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर श्री. भुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने आदी उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून ध्वजवंदनानंतर श्री. भाषणात श्री. भुमरे म्हणाले, शंखी गोगलगायीमुळे शेतपिकांच्या नुकसानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी वाटपाचे निर्देश दिले आहेत.
लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाने पशूंचा मृत्यू झाल्यास पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. २०१७ -१८ पासून पुढील तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नगर - बीड - परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाचे अतिरिक्त भूसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे. या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असेही श्री. भुमरे म्हणाले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न आहेत. जिल्हा परिषदेच्या थोडेसे माय बापासाठी पण या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. यानंतर श्री. भुमरे यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनामध्ये पोलिस विभागासह गृह रक्षक दल, बलभीम महाविद्यालय, सैनिक विद्यालय आदींचे एनसीसी पथक, शिवाजी विद्यालय व राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयाचे स्काऊट गाइड पथक, पोलिस बँड, पोलिस विभागाची रुग्णवाहिका, नगरपरिषदेचे अग्निशमन विभागाचे वाहन आदींनी सहभाग घेतला. यावेळी मंत्री संदिपान भुमरे यांनी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, आदींची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.