Marathwada News: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Marathwada News: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Updated on

Latests Marathi news : मसलगा ता. निलंगा येथील मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दिडशे फुट लांबीची भेग पडल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे प्रकल्प फुटेल या भितीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पाची दुरूस्ती पावसाळ्यापुर्वी का? केली नाही असा सवाल उपस्थित केला जात असून

खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी ता. सहा रोजी रात्री सहा गेट १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नव्वद टक्के साठलेला पाणीसाठा कमी करण्याची वेळ प्रशासनावर आली असून याबाबतची चौकशी करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Marathwada News: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Marathwada: मराठवाड्यातील 'या' रस्त्यावरील वाहतूक पंधरा दिवसापासून बंद, प्रवाशांची गैरसोय

सध्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मांजरा व तेरणा या दोन्ही नद्यांना पूर आला होता तर विविध प्रकल्पातील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. मसलगा मध्यम प्रकल्प आठ दिवसापूर्वी शंभर टक्के भरला होता प्रकल्पाने धोक्याची पातळी ओलांडली होती मात्र प्रशासन गंभीर नव्हते त्यातच तेथील शेतकऱ्यांनी ओहरफ्लो प्रकल्प झाल्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल केल्यानंतर प्रशासन प्रकल्प प्रशासनाने दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.

हि घटना ताजी असतानाच मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दिडशे फुटाची लांब भेग पडली असून रूंदी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Marathwada News: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Marathawada Crime: धर्म परिवर्तनासाठी पोलीस पत्नीचाच छळ, आष्टीत घडली धक्कादायक घटना!

याबाबत येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निदर्शनास चार दिवसाखाली मोठी भेग आली होती. त्या दिवशी भेगेची रुंदी चार इंच इथपर्यंत होती. मात्र तिच भेग चार दिवसानंतर पाहिली असता चार इंचावरुन दहा इंचापर्यंत वाढल्याने भिती निर्माण झाली आहे. ही बाब त्यांनी प्रशासनाला कळविली प्रकल्पाच्या भेग पडलेली माहीती

वाऱ्यासारखी गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता श्री. पवार, उपअभियंता आजय जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे सहा दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

प्रकल्पातून ६० टक्क्यापर्यंत पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते मसलगा मध्यम प्रकल्पातू येत्या काही दिवसात 40 ते सोळ नाल्याद्वारे मांजरा नदी पात्रात सोडण्याचे आदेश

Marathwada News: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Marathwada Crime: दहीहंडीत नाचण्याच्या कारणावरून झाला वाद, दोघांवर चाकूने वार; एकाचा मृत्यू

वरिष्ठांनी दिल्याचे उपअभियंता अजय जोजारे यांनी सांगितले. तर अमरसिंह पाटील यांना विचारले असता गतवर्षी तलावात पाणी उपलब्ध नसल्याने आणि यंदा जोरदार पाऊस होऊन एकदम पाणीसाठा १०० टक्के भरल्याने असा प्रकार घडला असावा किंवा इतर कोणते कारण असावे याचा शोध घेण्यासाठी एक्सपर्ट टिमला पाचारण केले आहे. खबरदारी म्हणून ३० टक्के पाणीसाठा कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Marathwada News: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Marathawada mukti sangram din : चौफेर विकासासाठी व्हावेत सामुदायिक प्रयत्न

मुळात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने असा प्रकार घडत आहे. येथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रोजंदारीवरील कामगार देखरेख करत आहेत. अनेक गावांची तहान भागवणारा एवढा मोठा प्रकल्पाची काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी करत असून गतवर्षी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आता पाणी सोडून दिल्यानंतर उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणण्याची वेळ येईल अशीही तिव्र भावना येथील नागरिकांनी बोलून दाखवली.

Marathwada News: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Marathawada mukti sangram din : चौफेर विकासासाठी व्हावेत सामुदायिक प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.