Latest cha Sabhajinagar News: परिसरात यंदा कापसाची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. यंदा सुरूवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतू परतीच्या पावसाने कापसाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरले गेले. सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.
दिवाळीच्या सुरूवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतू, परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडले. परिसरात झालेल्या पावसाने सोयाबीन, मुग, ज्वारी या पिकासोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.