फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव येथील रस्ता लगेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (ता.दोन) केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री सत्तार यांनी दिल्या.