Marathwada Rain News : मराठवाड्यातील १४८ मंडळांत अतिवृष्टी

सर्वाधिक अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यात झाली. नांदेडमधील तब्बल ६२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
rain
rainesakal
Updated on

Chh. Sambhaji Nagar : मराठवाड्याच्या विविध भागांत यंदाच्या पावसाळ्यात १४८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. १०० मिलिमीटरपेक्षा अधिक २७ मंडळांमध्ये दोनदा तर दोन मंडळांमध्ये तीनदा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

सर्वाधिक अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यात झाली. नांदेडमधील तब्बल ६२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यावर्षी मॉन्सून उशिराच दाखल झाला. पावसाळ्याचा दुसरा महिना उत्तरार्धाकडे आहे. जेवढा पाऊस झाला त्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. मराठवाड्यात जूनपासून आतापर्यंत २२९.८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे,

आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे. या २१ जुलैच्या सकाळी साडेदहापर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार, नांदेड जिल्ह्यात ३२७.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे तर सर्वांत कमी बीड जिल्ह्यात १७४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तसेच हिंगोली जिल्ह्यात २७७, लातूरमध्ये २४१.९, छत्रपती संभाजीनगर २०२.२, जालना २०४.८, धाराशिव १६८ तर परभणी जिल्ह्यात २०८.१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

rain
Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपले ढगफुटीसदृश पाऊस

१४८ मंडळांत अतिवृष्टी

चोवीस तासांत ६५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर ती अतिवृष्टी मानली जाते. एक जूनपासून २१ जुलैदरम्यान आठ जिल्ह्यांमध्ये १४८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वांत जास्त अतिवृष्टी झाली. या जिल्ह्यात ६२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याखालोखाल हिंगोली, परभणी जिल्ह्यातील मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. हिंगोलीत १५, परभणीत १४ मंडळांत, छत्रपती संभाजीनगर १२, जालना ४, बीड १०, लातूर १३ तर धाराशिव जिल्ह्यात ६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

दरम्यान, शुक्रवारी (ता.२१) सकाळी साडेदहापूर्वीच्या गेल्या चोवीस तासांत ४० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. दोन मंडळांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची अहवालात नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.