Latest LAtur News: जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १४४ प्रकल्पात ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प असून या पैकी केवळ दोनच मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. दोन मध्यम प्रकल्प अजूनही ५० टक्क्यांच्या आतमध्येच आहेत. दोन मोठे प्रकल्प मात्र शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे या वर्षी शेतीला चांगले उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १४४ प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा ८४४.२४१ दशलक्षघनमीटर इतका आहे. सध्या या प्रकल्पात ७६६.४२५ दशलक्षघनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा ६२६.७८१ दशलक्षघनमीटर झाला आहे. याची टक्केवारी ८८.९५ इतकी आहे.