नांदेड : माहूर तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून धनोडा घाट पुलाच्या अंदाजे दहा फुटावरून पाणी वाहत असल्याने मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला टाकळी गावाजवळील छोलेवाडी परिसरात शेतात राखण करण्यासाठी केलेले तीन शेतकरी व सहगुणोरे पुराच्या पाण्याने वेडा घातल्यामुळे अडखून पडले आहेत.
शेतकऱ्यांना पाण्या बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. माहूर तालुक्यात रात्री एक वाजता पासून मुसळधार पाऊस धो धो कोसळत आहे.पैनगंगा नदीने वेडलेल्या वानोळा माहूर वाई बाजार व सिंदखेड महसूल मंडळात शेत शिवारासह निवासी वस्तीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून कुठल्याही आपातकालीन उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. हजारो एकर शेतातील पिके वाहून जमीन सुद्धा खरडून गेली आहे,तर शेकडो घरात पाणी शिरल्याने अन्य धान्यासह संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे.संततधार पावसाने शेतशिवारासह तालुक्यातील चारही महसूल मंडळातील नदीकाठच्या गावाचे सखल भाग जलमय झाले आहे.
पैनगंगा नदीकाठच्या टाकळी गावाजवळील चोलेवाडी शिवारात शेत राखण्यासाठी गेलेले तीन शेतकरी पाण्याने वेळा घातल्यामुळे शेतात अडकून पडले आहेत त्यांच्यासोबत पाळीव जनावरांचा सुद्धा समावेश आहे तहसीलदार व अधिनस्त यंत्रणा घटनास्थळाच्या गावाजवळ थांबून आहेत मात्र कुठलेही आपत्कालीन यंत्रसामग्री नसल्यामुळे हातबल झाल्याने रात्रभरापासून शेतकरी बांधावर मदतीच्या अपेक्षेत ताटकळत बसलेले आहेत.
एकंदरीत तालुक्यात भिषण पुरपरिस्थीती निर्माण झाल्याने जनजिवन विस्कळीत झाले तर नुकसानीचा आकडाही मोठा आहे. रात्री सुरूवात झालेल्या पावसाने आज दुसऱ्या दिवशी रौद्र रूप धारण केले असून पर्जन्य मापन केंद्रावर पाण्याची किती नोंद झाली याचा खात्रीलायक आकडा मिळू शकलेला नाही.
वाढत्या पर्जन्यमानामुळे शेतशिवार पाण्याखाली येऊन नाले ओढे तुडूंब भरले.परिणामी पुराचे पाणी गावात आले ते अनेकांच्या दुकानात व घरांमध्ये शिरले.संसारपयोगी साहित्याची हानी झाली तर अनेक दुकानदारांचा तळघरातील माल पुराच्या पाण्यामुळे क्षतीग्रस्त झाला.माहूर तालुक्यात आजचा हा दिवस सदैव स्मरणात राहणारा ठरला आहे.
माहूर नगरपंचायत कडून आवाहन
पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून धनोडा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मराठवाड्यातील माहूर तालुक्याचा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा संपर्क पूर्णतः तुटला असून अत्यंत धोकादायक बनलेल्या या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन माहूर नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.
अडखुन असलेल्या भाविकांसाठी सूचना
माहूरगड येथे दर्शनासाठी आलेले व पावसामुळे रस्ते बंद झाल्यामुळे अडकून असलेल्या भाविकांना श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.या महाप्रसादाचा निःसंकोचपणे स्वीकार करण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.