अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा रोडवर मुकुंदराजच्या घाटात शुक्रवारी (ता.३०) सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान उसतोडीसाठी निघालेल्या मजुराचे ट्रॅक्टर उलटून ट्राॅलीची जोडपीन तुटल्याने झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला, इतर १५ जण जखमी झाले. जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती अशी, की येल्डा येथील उसतोड मजुरांचे ट्रॅक्टर पहाटेच लवाजम्यासह कर्नाटकमध्ये उसतोडीसाठी निघाले होते. आठ कोयत्याची ही टीम होती. वाटेत वाण नदी ते मुकुंदराजपर्यंत कठीण घाट आहे. या घाटात रस्ताही खड्यांचा आहे. हा ट्रॅक्टर घाटाच्या वर आल्यानंतर त्याच्या ट्राॅलीची पिन तुटली त्यामुळे हेडसह ट्रॅक्टर उलटले, आणा एकच आरडा ओरड सुरू झाली.
या परिसरात सकाळच्या माॅर्निंगवाॅक साठी आलेले काही जण तिकडे धावले, त्यांनी तात्काळ रूग्णविहिकेस फोन करून बोलावले, त्यामुळे जखमींना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू झाले, मात्र या रणजित अमोल कांबळे (वय ११) याचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातातील जखमी झालेले ऊसतोड कामगार
आशा बाळू माळी (वय २२), रूबीन जलील सय्यद (वय२०), अलीदा जलील सय्यद (वय ४७), दादाराव धनू गायकवाड (वय ३७), सुधाकर दिगंबर गवारे (वय ३५), सुरेखा सुधाकर गवारे (वय ३२), उषा धनंजय गायकवाड (वय २५), ललिता दशरथ गायकवाड (वय ३५), कोमल अमोल कांबळे (वय ४५), अनुजा अमोल कांबळे (वय ७), अनिता बाळू पवार (वय ३०), धुराजी माणिक मगर (वय ६५), महादेव धुराजी मगर (वय २८), सारिका महादेव मगर (३०), मंगेश दशरथ तिकटे (वय १६) रा. येल्डा व सोनपेठ हे १५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यांनी केली मदत
घटना घडताच जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, पेशकार नाना गायकवाड, शेख अन्वर, सुनिल कांबळे, सचिन अंजान, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे, पोलिस कर्मचारी जयदीप कसबे, पालिका कर्मचारी रमेश सोनकांबळे यांनी मदत केली.ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हेही रूग्णालयात पोचले. त्यांनी सर्व जखमींची अस्थेवाईकपणे चौकशी करून तात्काळ उपचारासाठी मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.