Gangadhar Gade: मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचं निधन

Gangadhar Gade: गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते.
 Gangadhar Gade death-
Gangadhar Gade death-esakal
Updated on

Gangadhar Gade: मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतील अग्रणी नेते आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक विचारांचे लढाऊ पँथर यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते.

पँथर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते. गंगाधर गाडे महाराष्ट्राचे माजी परिवहन राज्यमंत्री होते. ते पँथर चळवळीत लोकप्रिय नेता होते. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते.

७ जुलै १९७७ रोजी दलित पँथरचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती. १९९४ मध्ये, मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार केला गेला. 

 Gangadhar Gade death-
China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

गंगाधर गाडे यांचा जन्म १९३९ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला. १९७२ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. ते मंत्री देखील राहीले आहेत. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 Gangadhar Gade death-
Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.