विशेष टपाल लिफाफ्यावर मराठवाड्याचा केसर आंबा

केसर आंबा
केसर आंबा
Updated on

औरंगाबाद : मराठवाडा विभाग केसर आंब्यासाठी (Kesar Mango) प्रसिद्धीस आला आहे. विशिष्ट खास चव, रंग आणि आकारामुळे या आंब्याची गोडी देशाबरोबरच विदेशातही लागली असून मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आता हा आंबा टपाल विभागाच्या विशेष लिफाफ्यावर (स्पेशल कव्हर) झळकणार आहे. केसर आंब्याच्या जातीला त्याच्या विशिष्टतेसाठी भारत सरकारकडून ‘मराठवाडा केसर आंबा’ असा भौगोलिक संकेत (जीओ टॅग) (Geo Tag) मँगो ग्रोव्हर्स असोसिएशन औरंगाबाद यांना प्रदान करण्यात आला आहे. ही बाब मराठवाड्यासाठी (Marathwada) भूषणावह आहे. याचे औचित्य साधून भारतीय डाक विभागाने मराठवाडा केसर आंब्याला प्रसिध्दी मिळावी (Aurangabad) तसेच टपाल तिकीट संग्रह छंद जोपासणाऱ्या व्यक्तींसाठी व नागरिकांसाठी या विषयावरील विशेष लिफाफा काढला आहे. त्याचे अनावरण आज शुक्रवारी ( ता. २७) करण्यात येणार आहे.

केसर आंबा
पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेशही ऑनलाईन, ३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी

औरंगाबाद परिक्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल व्ही. एस. जयाशंकर यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, फळ संशोधन केंद्राचे एम. बी. पाटील, मराठवाडा आंबा उत्पादक संघाचे उपाध्यक्ष विजयअण्णा बोराडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर मुख्य डाकघर औरंगाबाद येथे विशेष डाक मोहोरद्वारे रद्दीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. या निमित्त प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबादचे जी.हरिप्रसाद यांनी सर्व नागरिकांना व टपाल तिकीट संग्रह जोपसणाऱ्या सर्वांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.