बीड : वैचारिक मतभेद, विभिन्न जीवनशैली, एकमेकांवर असलेला संशय, पतीची व्यसनाधिनता, नको झालेले एकत्र कुटुंब या व अशा अनेक कारणांवरून जोडप्यांमध्ये वाद होतात. त्यामुळे पत्नी माहेरी निघून जाते किंवा पती तिला घराबाहेर काढतो. अशा परिस्थितीत वाद किंवा राग शांत झाल्यानंतर पत्नी नांदायला येत नसेल किंवा पती नांदायला घेऊन जात नसेल तर साथीदार न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो. साथीदाराने केलेल्या या अर्जावर सुनावणी होऊन पुन्हा एकत्रित येत असलेले जोडपे विविध अटी व शर्ती ठेवत आहेत.