Market Committee Election : चक्क राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने भाजप सत्तेत ! अनोखी युती

सत्ता समीकरणात बदलले मित्र-विरोधक, राजकीय उलथापालथ
BJP,Shivsena,Ncp, Congress Election
BJP,Shivsena,Ncp, Congress Electionesakal
Updated on

जालना : जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत राजकीय उलथापालथ झाल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना शिंदे गट युती समीकरणात तोडमोड करत, सत्तासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने परतूरात भाजप सत्तेत आले आहे. परतूरच्या राजकीय समीकरणामुळे आष्टीत भाजप हा महाविकास आघाडीपेक्षा सरस ठरला आहे. तर महाविकास आघाडीने भाजपला मंठ्यात धोबीपछाड दिला आहे. शिवाय काँग्रेसला दूर ठेवत घनसावंगीमध्ये राष्ट्रवादीने सत्ता कायम राखले आहे. मात्र, अंबडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत करत भाजप सत्तेत आले.

परतूरमध्ये नवीन पॅटर्न

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचत भाजप शिवसेना (शिंदे गट) युतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाईल असे चित्र निर्माण झाले होते.

मात्र, स्थानिक पातळीवर सत्ता आपल्याच ताब्यात असावी यासाठी स्थानिक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर असलेल्या महाविकास आघाडीला स्थानिक पातळीवर दूर ठेवत राजकीय मिसळण करत सत्तेची खिचडी शिजवली. परतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढली आहे.

भाजपने मंठ्यात गमावले; परतूरात कमावले

मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून रोखले. येथे महाविकास आघाडीला १२ तर भाजपला सहा जागांवर विजय मिळाला. तर परतूरमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस या तीन पक्षांनी हात मिळवणी करत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढवली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस,

काँग्रेसच्या मदतीने भाजप सत्तेत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आले असून भाजपला सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दूर ठेवले. त्यामुळे या गटाला एकाच जागेवर विजय मिळवता आला.

आष्टीत भाजपला लाभ

आष्टी बाजार समिती निवडणुकीत भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला शह दिला आहे. भाजपने तब्बल १६ जागांवर विजय मिळविला. महाविकास आघाडीला केवळ दोन जागा राखता आल्या. दोन उमेदवारांना समान मते पडल्याने एका जागेचा फैसला चिठ्ठी काढून करण्यात आला, त्यात भाजपच्या पदरात ही जागा पडली.

काँग्रेसला दूर ठेवण्याचा राष्ट्रवादीला फटका

घनसावंगी आणि अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला दूर ठेवले होते. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करत मदत न करण्याचा निर्णय घेतला होता. तर घनसावंगीत शिवसेना ठाकरे गटातही ही दोन गट झाले होते, त्यात हिकमत उढाण हे भाजपसोबत युती करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले, मात्र त्यांना यश आले नाही. तर ठाकरे गट शिवसेनेचे शिवाजीराव चोथे हे महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिले.

घनसावंगीत महाविकास आघाडीच्या फुटीनंतरही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळत १७ जागा विजय मिळवला तर ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे यांच्या गटाला एका जागेवर विजय मिळाला. मात्र अंबडमध्ये काँग्रेसला दूर ठेवण्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. वर्षानुवर्ष अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत भाजपने विजय मिळवला आहे.

यात भाजप पॅनलमध्ये भाजप ११, शिवसेनेला दोन, रासप, काँग्रेसचे प्रत्येकी एक, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला तीन जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, शिवसेना ठाकरे गटाने एका जागेवर यश मिळवले. त्यामुळे अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा बोलबाला राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.