देवगावफाटा : लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि पवित्र व महत्वपूर्ण असा क्षण; मात्र, आता मुलांचे लग्न न होणे ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. आधी पालकांना मुलींच्या लग्नाची चिंता असायची, आता मुली मिळत नसल्याने मुलांच्या लग्नांची चिंता वाढत चाललेली पाहावयास मिळत आहे.
कारण मुलाला नोकरी हवी. आणि आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून, शेतीही हवी. असा अनाठायी हट्ट उपवर मुली व मुलींच्या कुटुंबीयांकडून केला जात असल्यामुळे मुलाला शेती हवी, पण शेतकरी नवरा नको गं बाई अशा अपेक्षा दिसून येत आहेत.
उच्च शिक्षण घेऊनही नोकरीपेक्षा स्वतःच्या शेतीला प्राधान्य देत बहुतांश ग्रामीण भागातील तरूणांनी आर्थिक सक्षमता प्राप्त केली. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग, विविध तंत्रज्ञानाचा वापर करून कुटूंबाला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या तरूणांची संख्याही समाजात कमी नाही.
एकीकडे तरुणांकडून शेतीबद्दलची सकारात्मक वाढीस लागत असतांना विवाहेच्छुक मुलींमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मात्र शेती आणि शेतकरी नवरा यांच्याबद्दलची नकारात्मकता वाढत चालली असल्याचे चित्र समोर येत आहे.
कारण मुलगा नोकरीवर असावा. त्यातही तो शासकीय नोकरीला असावा, अशी अनेक मुलींची अपेक्षा आहे. नवरा गोरा नसला तरी तो सुस्वरूप असावा आणि त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे, अशा अपेक्षा साधारण लग्नास इच्छुक मुलींच्या आहेत.
त्यात शेती करणारा मुलगा म्हटले की, तर नकारच मिळतो. कारण शेती नेहमी निसर्गावर अवलंबून असते. शेतकरी मुलाबरोबर लग्न केल्यास गावखेड्यात राहावे लागेल, अशा अनेक समज - गैरसमजामुळे शेती करणारे मुले नकोत, असा सूर सर्वत्र मुलींचा दिसून येत आहे.
शेतीला विवाहाच्या व्यासपीठावर सर्वात कमी प्रतिष्टेचे बनवले गेले आहे. त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लग्न करण्यास इच्छुक मुलांचे लग्न होण्यासाठी ही खुप मोठी समस्या बनली आहे.
गेल्या काही वर्षात जग बदलत चालले आहे. त्याप्रमाणात मुलींच्या, पालकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. जर मुलाला नोकरी असेल तरच आपल्याला आपल्या गरजा पुढे पूर्ण करता येऊ शकतात. हा विचार करूनच मुली अशा मुलांशी लग्न करत आहेत.
आता मुली मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. पाच आकडी पगाराची नोकरी करतात. त्यांना आपला नवरा हा आपल्याच तोडीचा किंवा वरचढ हवा असतो. या अपेक्षामध्ये जराही तडजोड करताना मुली दिसत नाहीत. त्यामुळे मुलांची मात्र, मोठी अडचण झाली आहे. कितीही चांगले स्थळ असले तरी लग्नाला मुलगी लवकर मिळत नाही.
सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. मात्र अनेक तरूणांना नोकरी, उद्योग नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांचा विवाह जुळवणे कठीण झाले आहे. अलिकडच्या काळात मुलींचे उच्चशिक्षण व त्या उच्चपदावर नोकरीस देखील आहेत.
त्यामुळे मुलींच्या अपेक्षा त्या प्रमाणात वाढल्या. त्यांना त्यांच्यासारखाच मुलगा हवा, यामुळे मुलांची पंचाईत झाली आहे. नाईलाजाने पैसे मोजूनही मुलांच्या कुंटूबीयांवर नवरी शोधण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.