आखाडा बाळापुर (जि.हिंगोली) : बाळापूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरुडतांडा येथील विवाहितेस हुंड्यातील (Crime) उर्वरित दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सासरच्या मंडळीने सदरील विवाहितेस मारहाण करून घराबाहेर हकलल्याची घटना घडल्याने सासरच्या नऊ जणांविरुद्ध आखाडा बाळापुर पोलिस स्थानकामध्ये सोमवारी (ता.३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील वरुडतांडा येथील विवाहितेस (Hingoli) सासरच्या मंडळीने हुंड्यातील राहिलेले दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून वेळोवेळी मारहाण केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली होती. याबाबत हिंगोली येथील महिला दक्षता समितीमध्ये सदरील प्रकरण गेले होते.
पण तिथेही प्रकरण मिटले नाही. शेवटी दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिल्याने अखेर पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी सासरा शामराव भाऊसिग आडे, पती अरविंद शामराव आडे, सासू, दीर सुनील शामराव आडे, चुलत सासरा बालाजी भाऊसिंग आडे, चुलत सासू, चुलत दीर विष्णू बालाजी आडे, चुलत जाऊ (सर्व रा. वरुड तांडा, ता. कळमनुरी) व आते सासु (रा. पळसवाडी तांडा, ता. हदगाव) यांच्याविरुद्ध आखाडा बाळापुर पोलिस स्थानकामध्ये नितुराणी अरविंद आडे यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलुस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार भगवान वडकिले करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.