ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणुक, Meghana Bordikar चा आरोप

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटाने पिचला आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार केवळ घोषणा करण्यात मग्न आहे.
Meghana Bordikar
Meghana Bordikaresakal
Updated on

परभणी : राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटाने पिचला आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार केवळ घोषणा करण्यात मग्न आहे. प्रत्यक्षात मदत देण्यात येत नाही. राज्यातील ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray Government) शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गावागावात काळा दिवस पाळला जाणार असल्याची माहिती भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (MLA Meghana Bordikar) यांनी रविवारी (ता.२४) दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 100 लाख हेक्टर शेतीवरील पिके पूर्ण नष्ट झालेले आहेत, असे असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने (Mahavikas Aghadi Government) हेक्टर १० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतू ही घोषणा फसवी असल्याचा आरोप करित जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यांपर्यंत (Parbhani) पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला आहे.

Meghana Bordikar
विजयवाडात भेसळयुक्त बिर्याणी! 'FSSAI'ने विक्रेत्यांना दिला इशारा

राज्यातील ठाकरे सरकार हे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे, असेही आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या. २०१९ मध्ये खुद्द उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यात येवून 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची आता अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या. परंतू आता शिवसेनेची भूमिका बदलली आहे. शेतकऱ्यां प्रति हे सरकार निर्दयी भूमिका बजावत असल्याचा आरोप त्यांनी केला. परभणी जिल्ह्यातही सर्वाधिक नुकसान झालेले असतांनाही पालकमंत्री नवाब मलिक यांच्यासह सत्तेतील आमदार, खासदार यांना त्यांच्या जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा विसर पडला की काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी केलेली १० हजार रुपये मदतीची घोषणा आम्हाला मान्य नाही असे सांगत हेक्टरी २५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी दिले गेले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. हे न झाल्यास येत्या एक नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गावांगावात भाजपचे कार्यकर्ते रिलायन्स कंपनीचे अनिल अंबानी व मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करतील असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संजय शेळके, संजय रिझवाणी, मोहन कुलकर्णी, रंगनाथ सोळंके, बाबासाहेब जामगे व इतर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.