Midday Meal Scam : मध्यान्ह भोजन योजनेत ‘घोटाळा’; गोण्यांमध्ये सात-आठ किलो धान्य भरले कमी

शाळांना मध्यान्ह भोजन योजनेचे (प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना) धान्य पुरवठादारामार्फत देण्यात येणाऱ्या तांदूळ व धान्यादी वस्तूंमध्येही मोठे गैरप्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे.
midday meal
midday mealsakal
Updated on

आष्टी - शाळांना मध्यान्ह भोजन योजनेचे (प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना) धान्य पुरवठादारामार्फत देण्यात येणाऱ्या तांदूळ व धान्यादी वस्तूंमध्येही मोठे गैरप्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे. शनिवारी (ता. १२) येथील कन्या प्रशालेत धान्य घेऊन आलेल्या टेम्पोमधील तांदळाच्या गोण्यांमध्ये सात ते आठ किलो धान्य मोजमाप केल्यानंतर कमी आढळून आले.

शहरातील कन्या प्रशालेमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीमध्ये सोनकिडे आढळून आल्याचा प्रकार मंगळवारी (ता. आठ) उघडकीस आला होता. शनिवारी (ता. १२) दुपारी मध्यान्ह भोजन योजनेचा तांदूळ व धान्यादी माल पुरवठा करणारा टेम्पो (एमएच-१३/ बीआर-४०८०) आष्टी शहरातील जिल्हा परिषदेच्या मुर्शदपूर, कन्या प्रशाला, मुर्शदपूर व गंगूबाई धोंडे प्राथमिक शाळेसाठीचे धान्य पुरवठा करण्याकरिता आला.

यावेळी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने कन्या प्रशालेत मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत मोजमाप करून पाहणी केली. तांदळाच्या ५० किलोच्या काही गोण्यांमध्ये सात ते आठ किलो धान्य कमी असल्याचे यावेळी मोजमापात स्पष्टपणे दिसून आले.

कन्या प्रशालेने विद्यार्थी संख्येनुसार एकूण २,८०० किलो तांदळाची मागणी केली होती.

मागणीनुसार ५० किलोप्रमाणे एकूण ५६ गोण्या प्राप्त झाल्या होत्या. वजनकाट्यावर मिळालेल्या या गोण्यांतील तांदळाचे वजन केल्यानंतर ८४ किलोग्रॅम धान्य कमी भरले तर बारदान्याचे वजन ३१ किलोग्रॅम असे एकूण ११५ किलो धान्य कमी आढळून आले.

मोजमापानंतर टेम्पो चालकाने दुसऱ्या शाळांसाठी आणलेल्या मालातून कमी पडलेले धान्य शाळेला दिले.

धान्य पुरवठादारामार्फत पुरविण्यात आलेल्या मालाचे वजन करून धान्याचा दर्जा तपासून घेण्याची जबाबदारी शाळेची आहे. मिळालेले धान्य व धान्यादी वस्तू सुरक्षित ठेवत त्याची जपवणूक करून नुकसान होऊ नये, यासाठीही शाळेने दक्ष राहिले पाहिजे.

- सुधाकर यादव, गटशिक्षणाधिकारी, आष्टी

वजनासाठी शाळेत काटेच नाहीत

योजनेअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या मालाचे वजन करण्यासाठी शाळांमध्ये अथवा धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनामध्ये वजनकाटा असणे बंधनकारक आहे. मात्र, शनिवारी धान्य पुरविण्यासाठी आलेल्या टेम्पोमध्ये नादुरूस्त असलेला वजनकाटा केवळ नावापुरता ठेवण्यात आला होता. तर, चारपैकी एकाही शाळेमध्ये वजनकाटा नसल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.