हिंगोली : भारीचा मोबाईल घेण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने शहरालगत असलेल्या गंगानगर भागातील बँक ऑफ इंडिया (Bank Of India) फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस नागरिकांच्या सतर्कतेने त्याचा प्रयत्न फसला. या बाबत शनिवारी (ता.२५) ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील एक अल्पवयीन मुलगा नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शाळेत नववीत शिक्षण घेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी तो गावाकडे आला होता. शाळेकडून त्याला शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यास बँकेत खाते काढण्यास सांगितले होते. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी त्याची आई त्याला सोबत घेऊन हिंगोली (Hingoli) शहरालगत गंगानगर येथील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेत आली होती. यावेळी त्या मुलाने संपूर्ण बँक फिरून पाहिली होती. (minor girl attempting breaking Bank In Hingoli)
दरम्यान, त्याने भारीचा मोबाईल खरेदीसाठी बँक फोडून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉड घेऊन बँकेच्या मागे लपला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन त्याने बँकेच्या पाठीमागील भितींला छिद्र पाडण्यास सुरवात केली. काही वेळानंतर बँकेच्या मागून आवाज येत असल्याने नागरिकांनी पाहणी केली. तसेच रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या जमादार सुधीर तपासे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. मात्र त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. एन . मळघने, पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे , जमादार रवी हरकाळ, आकाश पंडितकर आदींनी त्याचा शोध सुरु केला.
तो मुलगा सावरखेडा गावाकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Hingoli Police) तेथे संपर्क साधला. त्या ठिकाणी रस्त्याच्या कामावर असलेल्या मजूरांनी त्यास पकडून ठेवले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता गाणे ऐकण्यासाठी मोबाईल नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी त्या ठाण्यात गुन्हा मुलाविरुध्द दाखल झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.