Ausa News : आमदार अभिमन्यू पवार राबविणार शेतकऱ्यांसाठी 'पॉवर ऑन व्हील' संकल्पना

नादुरुस्त रोहित्र दुरुस्त होईपर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध होणार ट्रॉलीतील रोहित्र.
Power on Wheel
Power on Wheelsakal
Updated on

औसा - अनेकदा रोहित्र नादुरुस्त किंवा जळाल्यावर तो रोहित्र दुरुस्त होऊन यायला वेळ लागतो. या दरम्यान पाण्याविना शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. जर शेतकऱ्याला मूळ रोहित्र दुरुस्ती होऊन येईपर्यंत पिकाला एखादे पाणी मिळाले तर शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमदार अभिमन्यू पवारांनी राज्यात प्रथमच 'पॉवर ऑन व्हील' ही संकल्पना राबविली.

यामध्ये एका ट्रॉलीवर १०० एचपीचा रोहित्र बसवलेला असून आणीबाणीच्या काळात शेतकऱ्यांनी ही ट्रॉली घेऊन जाऊन पिकाला पाणी देण्यापूरती लाईट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता रोहित्र नादुरुस्ती मुळे एकाही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही. राज्यात प्रथमच सुरू होत असलेल्या या अभियानाचे लोकार्पण आमदार अभिमन्यू पवारांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) रोजी महावितरणच्या अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

ऐन सुगीच्या काळात लोड येऊन अनेकदा रोहित्र जळतात. हे रोहित्र दुरुस्त होऊन यायला कधी कधी आठ आठ दिवस लागतात. त्यामुळे कमी कालावधीची पिके जसेकी कोथिंबीर, टरबूज, खरबूज, भाजीपाला, जनावरांना पिण्यासाठीचे पाणी यावर मोठा परिणाम होतो. या पिकांना दररोज पाणी लागत असल्याने पाण्याअभावी पिके करपून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तर जनावरांना पाणी उपलब्ध नसल्याने मुक्या प्राण्यांचे हाल होतात.

ही बाब आमदार अभिमन्यू पवारांनी लक्षात घेऊन महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता, टेक्निकल विभागातील अधिकारी व तज्ज्ञांची बैठक घेऊन यावर काय उपाययोजना करता येईल हे तपासले. या सर्वांच्या विचारविनिमयातून टेक्निकल विभागाने एक कोणत्याही ट्रॅक्टरला सहज जोडली जाणारी ट्रॉली तयार करून त्यावर १०० एचपीचे रोहित्र बसविण्यात आले.

ही ट्रॉली फक्त शेतकऱ्यांनी मूळ रोहित्र असलेल्या ठिकाणी उभी करायची. लाईनम ट्रॉलीतील रोहित्राचा सप्लाय शेतकऱ्यांच्या मोटारीला होणाऱ्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ताराना जोडून विद्युत पुरवठा सुरू करतील. या ट्रॉलीतील रोहित्राला लांब वायर व सर्व यंत्रणा जोडण्यात आली असल्याने विद्युत पुरवठा करतांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच हे रोहित्र बनविताना व ते ट्रॉलीत बसविताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याने हे चालते फिरते रोहित्र शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारे व महावितरण विभागात सुवर्णाक्षरांनी नोंद करणारे ठरणार आहे.

'डीपी जळल्याने कोथिंबीर, टरबूज, खरबूज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने या बाबत महावितरण विभागातील अधिकाऱ्यांची मी चर्चा केली. या चर्चेतून चालते फिरते रोहित्र ही संकल्पना उदयास आली. ज्या शेतकऱ्यांचे रोहित्र नादुरुस्त आहे अशा शेतकऱ्यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधून ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोहित्र घेऊन जाऊन पाण्याअभावी सुकत आलेल्या पिकांना पाणी द्यावे.

यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याचा माझा प्रयत्न आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच औसा मतदारसंघात माझ्या निधीतून होत आहे. माझ्या या संकल्पनेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार्य केले. शेतकरी हिताचे निर्णय यापूर्वीही घेतले आहेत. आणि पुढेही घेतले जातील. प्रायोगिक तत्त्वावर सध्या आठ रोहित्र उपलब्ध करण्यात आले असून भविष्यात गरजेनुसार याची व्याप्ती वाढवली जाऊ शकते.

- आमदार अभिमन्यू पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.