अंबड (जि. जालना) - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शिराढोन येथे मंगळवारी (ता. 21) गावात धार्मिक कार्यक्रमाची सांगता होती. याच कार्यक्रमात गावातील हनुमान मंदिराच्या सामाजिक सभागृहाच्या भूमीपूजनाचे नारळ फोडण्यासाठी आमदार नारायण कुचे हे अभियंता यांना सोबत घेऊन आले होते.
गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या हि गोष्ट लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. मराठा समाजाला जोपर्यंत सरकार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देत नाही.
तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊन कोणत्याही कामाचे किंवा फलकाचे अधिकृत उदघाटन करू नये. असा पवित्रा सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने घेण्यात आला आहे. आमदार नारायण कुचे यांनी शिराढोन गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी त्यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देत आमदार कुचे यांना गावाच्या बाहेर जाण्यास प्रवृत्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिराढोन येथील गावातील हनुमान मंदिराचे काम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केले. या हनुमान मंदिराला त्यांच्या स्थानिक आमदार फंडातून लाख लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाची वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर आमदार कुचे यांनी मंगळवारी (ता. 21)अभियंता यांना सोबत घेऊन सामाजिक सभागृहाच्या भूमीपूजनाचे नारळ फोडून उदघाटन करण्याचा बेत आखला होता.
मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना लोकप्रतिनिधी अशा प्रकारे उदघाटन करण्याचा घाट घालत असल्याचे लक्षात येताच गावातील तरुण युवकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत आमदार कुचे यांना अखेर ग्रामस्थाचा उद्रेक पाहून तात्काळ काढता पाय घ्यावा लागला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.